आँखें भी होती हैं दिल की ज़ुबान! डोळे सांगतात तुमच्या मनातील गोष्टी, तुमच्या डोळ्यांचा रंग सांगतो तुमचा स्वभाव
आपल्या मनात, डोक्यात एखादा विचार सुरू असेल, तर त्याचे काहिसे प्रतिबिंब आपला चेहरा आणि आपल्या डोळ्यात दिसते. आपण सहज एखाद्याच्या डोळ्याकडे पाहून तो उदास का आहे याचा अंदाज लावू शकतो. डोळ्यांविषयी समुद्रशास्त्र काय सांगते, जाणून घेऊया.
Eyes: डोळ्यांची भाषा डोळ्यांनीच बोलावी... न उलगडल्या भावनांना कसं काय नेत्रांनीच तोलावी...असे म्हटले जाते. आपल्या डोळ्यांच खूप महत्त्व आहे. आपल्या नशिबाचा संबंध केवळ ग्रह, नक्षत्र, हस्तरेषा आणि कुंडलीशी नाही तर डोळ्यांशी आहे. डोळ्यांना भाषा नसते, तरीही ते आपल्याबद्दल खूप काही सांगतात, आपल्याला फक्त डोळ्यांची भाषा समजण्यासाठी कोणीतरी हवे असते. एखाद्या व्यक्तीच्या केवळ डोळ्यांकडे पाहून त्याच्या मनात काय चालले असेल, याचा वेध घेतला जाऊ शकतो. आपल्या मनात, डोक्यात एखादा विचार सुरू असेल, तर त्याचे काहिसे प्रतिबिंब आपला चेहरा आणि आपल्या डोळ्यात दिसते. आपण सहज एखाद्याच्या डोळ्याकडे पाहून तो उदास का आहे याचा अंदाज लावू शकतो. डोळ्यांविषयी समुद्रशास्त्र काय सांगते, जाणून घेऊया...
डोळ्यांचा आकार उलगडचो व्यक्तीमत्वाचे रहस्य?
एखाद्याच्या डोळ्यात पाहिल्यानंतर आपल्याला आपुलकी, विश्वास, क्रोध किंवा निराशा आपल्याला डोळ्यात दिसतात. त्यामुळे माणसाची पारख करण्यासाठी, त्याचे व्यक्तिमत्त्व ओळखण्यासाठी नजर खूप महत्त्वाचा भाग आहे. मनात राग असलेल्या व्यक्तीचे डोळे अनेकदा लाल दिसतात, एखाद्याच्या हृदयात प्रेम, करुणा, वात्सल्य इत्यादी भावना आपोआप डोळ्यांत दिसू लागतात. या डोळ्यांच्या लक्षणांनुसार माणसाच्या मानसिक स्थितीचे रहस्य उलगडते. डोळ्यांचा रंग एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आरशाप्रमाणे प्रतिबिंबित करतो. बहुतेक लोकांचे डोळे काळे आणि तपकिरी असतात. काही लोकांचे डोळे, हिरवे, निळे, राखाडी असतात. निळे डोळे असलेले लोक गंभीर, शांतीप्रिय असतात. तर हिरवे डोळे असलेले लोक इतरांपेक्षा अधिक बुद्धिमान असतात. हिरवे डोळे बुध ग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात डोळ्यांची रचना, आकार, चेहऱ्यावरील स्थिती, रंग आणि अष्टपैलुत्व, दृष्टी या आधारे भविष्य वर्तवले जाते.
कोणत्या आकाराचे डोळे शुभ?
बदामाच्या आकाराचे डोळे किंवा कमळाच्या पानांसारखे डोळे अतिशय शुभ मानले जातात, असे लोक प्रसिद्धी, आरोग्य, समृद्धी, आनंद आणि यशाचे जीवन जगतात. याउलट, पोपटासारखे गोल डोळे दर्शवतात की ती व्यक्ती आत्मकेंद्रित, स्वार्थी आणि चंचल आहे. कमळासारखे डोळे असल्यास व्यक्ती भाग्यवान असते. हरीण किंवा सशासारखे डोळे असलेली व्यक्ती आयुष्यभर आनंदात राहते.
डोळ्याचा रंग काय सांगतो?
निळे डोळे शनीचे वर्चस्व असलेले व्यक्तिमत्व दर्शवतात, हिरवे डोळे बुधाचे वर्चस्व दर्शवतात, काळे डोळे शनीची स्थिती दर्शवतात, राखाडी डोळे राहू, केतूच्या स्थितीचे मूल्यांकन करतात. चंद्राचे वर्चस्व असलेले डोळे अस्वस्थ आणि अस्थिर आहे. त्यांच्या पापण्या वारंवार उघडझाप होते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि इतरांच्या वाईट नजरेपासून त्यांचे रक्षण करण्यासाठी दररोज सूर्याला अर्घ्य द्यावे. भगवान सूर्याचे स्तोत्र पठण केल्यास डोळ्यांची चमक वाढते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)