Dussehra 2024 : दसऱ्यानंतरचा काळ 3 राशींसाठी ठरणार सोन्याचा; 12 ऑक्टोबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Astrology 12 October 2024 : यंदाचा दसरा काही राशींसाठी विशेष ठरणार आहे. या काळात मोठ्या ग्रहांच्या हालचाली होत आहेत, ज्या 3 राशींचं नशीब पालटू शकतात.
Astrology 12 October 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर, म्हणजेच 12 ऑक्टोबरपासून (Dasara 2024) अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहेत, ज्याचा परिणाम सर्व राशींवर होईल.17 ऑक्टोबर रोजी ग्रहांचा राजा सूर्य तूळ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचा तूळ राशीतील प्रवेश अतिशय शुभ मानला जातो. 20 ऑक्टोबरला मंगळ देखील कर्क राशीत प्रवेश करणार आहे, ज्यामुळे 3 राशींचं नशीब उजळेल. त्यामुळे यंदाचा दसरा 3 राशींसाठी सर्वांगी शुभ आणि सोन्याचा ठरणार आहे. त्यामुळे ग्रहाच्या संक्रमणामुळे 12 ऑक्टोबरपासून कोणत्या राशी (Zodiac Signs) सुखात जीवन जगणार? जाणून घेऊया.
दसऱ्याला 4 दुर्मिळ योग
1. रवि योग
2. शश योग
3. मालव्य योग
4. सर्वार्थ सिद्धी योग
12 ऑक्टोबरपासून 3 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार
मेष रास (Aries)
ग्रहांच्या संक्रमणामुळे दसऱ्यापासून तयार होत असलेले दुर्मिळ योग मेष राशीसाठी फायदेशीर ठरू शकतात. या काळात कामाच्या ठिकाणी तुमचे सहकाऱ्यांशी संबंध सुधारतील. तुम्ही जोडीदारासोबत कुठेतरी प्रवासाची योजना आखू शकता. अडकलेला पैसा लवकरच तुमच्याकडे येईल. तुमचं आरोग्य पूर्वीपेक्षा चांगलं राहील. तुम्हाला कुठेतरी प्रवासाचे बेत आखता येतील. रवि योग, शश योग, मालव्य योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तुमच्या जीवनात अनेक नवीन बदल घडवून आणू शकतात.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीसाठी रवि योग, षष्ठ योग, मालव्य योग आणि सर्वार्थ सिद्धी योगांची निर्मिती खूप शुभ ठरेल. या काळात तुम्हाला कामाशी संबंधित तणावातून आराम मिळू शकतो. तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. कुटुंबासोबत कुठेतरी फिरायला जाण्याची योजना तुम्ही आखू शकता. या काळात तुम्हाला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. थोडा संयम बाळगणं तुमच्या भविष्यासाठी फायद्याचं ठरेल. तुम्ही अनावश्यक वादांपासून जितकं दूर राहाल, तितकं सुखी जीवन तुम्ही जगू शकाल. चांगल्या आहार घ्या, तरच आरोग्य चांगलं राहील.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीसाठी दसऱ्यापासूनचे दिवस सोन्यासारखे असतील. तुम्हाला 12 ऑक्टोबरपासून चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. उत्पन्नात चांगली वाढ होईल. आर्थिक अडचणीतून सुटका मिळेल. अनावश्यक वादापासून दूर राहा. व्यवसायात प्रगती होऊ शकते. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचं सहकार्य मिळेल. कुटुंबाशी संबंध सुधारतील. जुने मित्र पुन्हा भेटू शकतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: