Dream Interpretation : स्वप्नात ही गोष्ट पाहणे म्हणजे भाग्याचे लक्षण! स्वप्नशास्त्रातून त्याचा अर्थ जाणून घ्या
Dream Interpretation: स्वप्नशास्त्रानुसार, प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो. स्वप्नशास्त्रातून जाणून घेऊया.
Dream Interpretation : स्वप्नशास्त्रानुसार (Swapna Shashtra) प्रत्येक स्वप्नाचा अर्थ वेगवेगळा असतो. बहुतेक लोकांना रात्री झोपताना विविध प्रकारची स्वप्ने पडतात. तसे स्वप्न पाहणे ही सामान्य गोष्ट आहे. पण काही स्वप्ने चांगली असतात तर काही खूप वाईट. तुम्हाला तुमच्या स्वप्नात काय दिसले? याचे वेगळे अर्थही असू शकतात.
तुमचे नशीब लवकरच उजळणार
स्वप्नशास्त्रानुसार, तुम्ही स्वप्नात जर दरवाजा उघडा पाहिला, तर हे स्वप्न सूचित करते की, तुमचे नशीब लवकरच उजळणार आहे. तुमचे सर्व त्रास लवकरच संपणार आहेत. स्वप्नात कोणत्या प्रकारचे दार पाहणे म्हणजे काय? हे स्वप्नशास्त्रातून जाणून घेऊया.
सकाळी हे स्वप्न पाहणे खूप शुभ
स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात उघडे दार पाहणे एक विशेष सुचना देते. विशेषतः सकाळी हे स्वप्न पाहणे खूप शुभ मानले जाते. जर तुम्हाला स्वप्नात बाहेरून घर दिसत असेल आणि त्याचे दरवाजे उघडे असतील तर हे स्वप्न देखील खूप चांगले मानले जाते. म्हणजे तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडले आहेत आणि आता तुमचे सर्व रखडलेले काम पूर्ण होणार आहे.
नोकरीत प्रगतीचा मार्गही खुला होणार
नोकरीत तुमच्या प्रगतीचा मार्गही आता खुला झाला आहे. उघड्या दरवाजाचे स्वप्न पाहणे खूप भाग्यवान मानले जाते. हे स्वप्न देखील घरात आनंद दर्शवते.
बंद दाराचे स्वप्न
स्वप्नात बंद दरवाजा दिसणे फार अशुभ मानले जाते. हे स्वप्न नकारात्मक ऊर्जा आणते, ज्यामुळे तुमचे नुकसान देखील होऊ शकते. हे स्वप्न सांगते की तुमच्या चालू कामात काही अडथळे येऊ शकतात. तुमच्या पैशाची आवक काही काळ थांबेल आणि तुमच्या नोकरी-व्यवसायात अडथळे येण्याची शक्यता आहे. जर तुम्ही असे स्वप्न पाहिले असेल, तर जपमाळ, देवाचे नामस्मरण करा आणि तुमच्या कुळदेवतेची प्रार्थना करा की, हा वाईट काळ लवकर निघून जाईल.
स्वप्नात पाणी पाहणे शुभ की अशुभ?
स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात पाऊस दिसला तर ते तुमच्यासाठी शुभ संकेत आहे. याचा अर्थ पैसा आणि भौतिक लाभ मिळणार. असे स्वप्न सूचित करते की तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे आणि तुमचे रखडलेले काम पूर्ण होणार आहे. दुसरीकडे, जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात मुसळधार पाऊस दिसला तर याचा अर्थ देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात स्वच्छ पाणी पाहिले असेल तर हे स्वप्न शुभ स्वप्न मानले जाते. म्हणजे नोकरी व्यवसायातील लोकांना प्रगती होणार आहे. घरात काही धार्मिक किंवा शुभ कार्याचे आयोजन होणार आहे
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या :
Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ