Diwali 2023: शनिच्या मार्गक्रमणाने दिवाळीत बनला शक्तिशाली राजयोग; 'या' 3 राशींचं नशीब पालटणार, बक्कळ पैसा येणार
Shash Mahapurush Rajyog: ज्योतिष शास्त्रानुसार, 12 नोव्हेंबरला ग्रहाच्या चालींत बदल झाल्यामुळे एक शक्तिशाली योग निर्माण झाला आहे. या बदलाचा फायदेशीर परिणाम तीन राशींवर होणार आहे.
![Diwali 2023: शनिच्या मार्गक्रमणाने दिवाळीत बनला शक्तिशाली राजयोग; 'या' 3 राशींचं नशीब पालटणार, बक्कळ पैसा येणार diwali shani dev makes shash mahapurush rajyog these 3 zodiac signs luck will shine lot of money will come Diwali 2023: शनिच्या मार्गक्रमणाने दिवाळीत बनला शक्तिशाली राजयोग; 'या' 3 राशींचं नशीब पालटणार, बक्कळ पैसा येणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/11/5f0ae1c816caf7dd4a376fc913e5f2d71699672074428223_5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shani Dev In Kumbh: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, एक ठराविक कालावधी पूर्ण झाल्यानंतर ग्रह आपली राशी बदलत राहतात. या दिवाळीत, म्हणजेच 12 नोव्हेंबरला एक विशेष योग तयार झाला आहे. वास्तविक, शनिदेवाने (Shani) कुंभ राशीत प्रवेश केल्याने षष्ठ महापुरुष राजयोग घडत आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, हा सर्वात शक्तिशाली योग मानला जातो. दिवाळीच्या दिवशी आयुष्मान योगही तयार झाला आहे. या योगांमुळे तीन राशींना भरपूर लाभ मिळणार आहे. कसा ते जाणून घेऊया!
मेष रास (Aries)
मेष राशीसाठी हा योग भाग्यशाली ठरेल. या लोकांना आर्थिक लाभ होईल. पैसे कुठेतरी गुंतवले तर फायदा होईल. दुसरीकडे मेष राशीच्या लोकांनी सल्ल्यानुसार शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले तर त्यांना फायदा होईल. तसेच, मेष राशीच्या लोकांच्या व्यवहाराचा परिणाम त्यांच्या वागण्यावर होईल. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या जोडीदाराचीही प्रगती होऊ शकते. तुमच्या कुटुंबाची भरभराट होईल.
मिथुन रास (Gemini)
महापुरुष राजयोगाचा परिणाम मिथुन राशीच्या लोकांवर देखील होणार आहे. नशीब या लोकांना साथ देणार आहे. अशा अनेक गोष्टी घडणार आहेत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंद येईल. मिथुन राशीच्या लोकांची व्यवसायात खूप वेगाने प्रगती होणार आहे. नोकरी किंवा व्यवसायात मेहनत केल्यामुळे व्यक्तीची वेगळी ओळख निर्माण होईल. संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल, ज्यामुळे व्यक्तीचं मन शांत राहील. व्यवसायाशी संबंधित नवीन काम सुरू केल्यास काही दिवसांत यांचे चांगले परिणाम पाहायला मिळू शकतात. तसंच, या काळात तुम्ही देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी तुम्ही कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकता.
मकर रास (Capricorn)
दिवाळीत बनलेल्या राजयोगाचा परिणाम मकर राशीच्या लोकांवर देखील होणार आहे. मकर राशीच्या लोकांचं वैयक्तिक आयुष्य खूप चांगलं असणार आहे, त्यांना धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. सर्व प्रलंबित कामं पूर्ण होताना दिसत आहेत. जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील. आरोग्य सुधारेल आणि जुन्या आजारांपासून आराम मिळेल. मकर राशीच्या लोकांना या काळात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)