Diwali 2023: दिवाळीच्या मुहूर्तावर आज आदित्य मंगल योग; 'या' 4 राशींसाठी शुभ, मिळणार धन-समृद्धीचा लाभ
Diwali 2023: यंदाच्या दिवाळीत आयुष्मान योग, सौभाग्य योग यांसह अनेक शुभ योग तयार होत आहेत, त्यामुळे अनेक राशींसाठी दिवाळीचा दिवस शुभ ठरणार आहे.
![Diwali 2023: दिवाळीच्या मुहूर्तावर आज आदित्य मंगल योग; 'या' 4 राशींसाठी शुभ, मिळणार धन-समृद्धीचा लाभ diwali 2023 Top 4 Luckiest Zodiac Sign On Aditya Mangal Rajyog Is Very Beneficial For Mesh Kark Kanya Vrishchik And Makar Rashi Diwali 2023: दिवाळीच्या मुहूर्तावर आज आदित्य मंगल योग; 'या' 4 राशींसाठी शुभ, मिळणार धन-समृद्धीचा लाभ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/12/5936d83d0041435aa0d86ec88e6261d21699780621296557_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Diwali 2023: आज दिवाळीत (Diwali 2023), 12 नोव्हेंबर रोजी चंद्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे, भौतिक सुख-सुविधांचा स्वामी शुक्र आहे. आज लक्ष्मी पूजन आहे आणि या दिवशी सुख, समृद्धी आणि वैभव प्राप्त करण्यासाठी गणेश आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी आयुष्मान योग, सौभाग्य योग, महालक्ष्मी योग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवाळीच्या आजच्या दिवसाचं महत्त्व खूप वाढलं आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, चार विशेष राशींना दिवाळीच्या दिवशी या शुभ योगांचा लाभ मिळणार आहे.
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा, म्हणजेच 12 नोव्हेंबरचा दिवस महालक्ष्मी योगामुळे शुभ असणार आहे. कर्क राशीचे लोक दिवाळीचा पुरेपूर आनंद घेतील आणि कुटुंबातील सदस्यांना भेटवस्तूही देतील. तुम्ही कुटुंबाच्या गरजांसाठी सहज पैसे खर्च कराल आणि लक्झरी वाहन किंवा घर देखील खरेदी करू शकता. देवी लक्ष्मीच्या कृपेने कर्क राशीच्या लोकांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये आज वाढ होण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या निमित्ताने कुटुंबातील सदस्यांसोबतची तुमची जवळीक वाढेल आणि त्यांच्याबद्दल तुमचं प्रेम आणि आपुलकीही वाढेल. कुटुंबातील कोणताही सदस्य दूर राहत असल्यास तो दिवाळीनिमित्त घरी येऊ शकतो आणि परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांकडूनही दिवाळीच्या शुभेच्छा तुम्ही स्वीकाराल. दिवाळीच्या खरेदीमुळे आज दिवसभर व्यापारी व्यस्त राहणार आहेत.
कन्या रास
सौभाग्य योगामुळे आज, म्हणजेच 12 नोव्हेंबर हा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. कन्या राशीचे लोक आज आत्मविश्वास आणि धैर्याने सर्व कामं सहज पूर्ण करतील आणि त्यांचं भाग्य उजळेल. आज तुम्ही तुमच्या शत्रूंवर आणि विरोधकांवर विजयी व्हाल आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहील. कन्या राशीचे लोक दिवाळीनिमित्त घर सजवतील आणि घरी तयार केलेल्या पदार्थांचा आस्वादही घेतील. कुटुंबात काही कलह सुरू असेल तर तो संपेल आणि संपूर्ण कुटुंब लक्ष्मीपूजनात सहभागी होईल. लक्ष्मी देवीच्या कृपेने व्यावसायिकांची कामं सहज पूर्ण होतील आणि आर्थिक प्रगतीमुळे मनही प्रसन्न राहील. लव्ह लाईफमध्ये नवीनता आणि गोडवा येईल, ज्यामुळे नातं मजबूत होईल. भावांसह शेजाऱ्यांना दिवाळी भेटवस्तू देणार आणि दिवाळीचा आनंद लुटणार.
वृश्चिक रास
आदित्य मंगल योगामुळे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा, म्हणजेच 12 नोव्हेंबरचा दिवस आनंददायी असणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना देवी लक्ष्मीच्या कृपेने भाग्याची साथ मिळेल आणि संपूर्ण कुटुंबासह गणेश लक्ष्मीची पूजा देखील करतील. तुम्ही तुमच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित कराल आणि तुमच्या जीवनात आनंद आणि शांतीचं वातावरण असेल. दिवाळीमुळे तुम्हाला चांगले पदार्थ खाण्याची संधी मिळेल आणि कौटुंबिक व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. सामाजिकदृष्ट्या, तुमच्या कुटुंबाची आज चांगली प्रगती होईल आणि तुमची प्रतिष्ठा वाढेल. आज तुम्हाला अडकलेले पैसेही परत मिळतील, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील आणि तुमचा मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. तुमच्याकडे जुने कर्ज असेल तर तेही आज फेडता येईल. दिवाळीमुळे तुम्ही दिवसभर घरगुती कामात व्यस्त असाल आणि तुमच्या भावा-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. जर तुम्ही आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येने त्रस्त असाल तर आज तुमचे आरोग्य सुधारेल.
मकर रास
शुभ योगामुळे मकर राशीच्या लोकांसाठी दिवाळीचा दिवस सकारात्मक असणार आहे. मकर राशीचे लोक आज सकाळपासून धार्मिक कार्य करतील आणि दिवाळीनंतर कुटुंबीयांसह काही तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची योजना आखतील. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही सकारात्मक बातम्या ऐकायला मिळतील आणि शेजाऱ्यांशी संबंध चांगले राहतील. मकर राशीचे लोक आज मोठ्या थाटामाटात दिवाळीची पूजा करतील आणि कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे आशीर्वादही त्यांना मिळतील. दिवाळीमुळे संपूर्ण कुटुंब घरात एकरूप होऊन दिवाळीच्या तयारीत सर्व सदस्यांचे सहकार्य असेल. आज दिवाळी असल्याने कापड व्यावसायिकांना मोठा नफा मिळू पाहत आहे. तुम्ही कौटुंबिक सदस्यांसह सामाजिक कार्यक्रमात देखील उपस्थित राहू शकता, जिथे तुम्ही विशेष लोकांना देखील भेटू शकता. व्यवसायात चांगला नफा होईल आणि तुमच्या सूचनांचेही स्वागत केले जाईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)