एक्स्प्लोर

Diwali 2023: दिवाळीपर्यंत बनणार 'हे' शुभ योग; सुख, शांती आणि समृद्धी नांदणार

Diwali Shubh Yog 2023: यावर्षी दिवाळीला अनेक शुभ योग घडत आहेत. सर्व राशींना या शुभ योगाचा फायदा होणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या दिवशी कोणता योग तयार होत आहे.

Diwali 2023 Date: हिंदू धर्मात दिवाळी (Diwali 2023) हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला हा सण साजरा केला जातो. यावेळी 10 नोव्हेंबर 2023 रोजी धनत्रयोदशीपासून दिवाळी सण सुरू होत आहे. 12 नोव्हेंबरला अभ्यांग स्नाने मुख्य दिवाळी साजरी केली जाईल, याच दिवशी लक्ष्मी पूजन असेल. मंगळवारी, 14 नोव्हेंबरला दिवाळी पाडवा असेल आणि 15 नोव्हेंबरला भाऊबीज साजरी केली जाईल. यासह दिवाळी हा सण समाप्त होईल. यावेळी दिवाळीपर्यंत अतिशय शुभ योग तयार होत आहेत, ज्याचा लाभ प्रत्येक व्यक्तीला मिळणार आहे.

Diwali Puja timings 2023 : ग्रह आणि ताऱ्यांचा शुभ संयोग

ज्योतिषी डॉ. अनिश व्यास यांनी सांगितलं की, भारतीय ज्योतिषशास्त्रात योगांचं खूप महत्त्व आहे. यंदा दिवाळीपूर्वी पुष्य नक्षत्रासह अष्ट महायोगाचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. यंदा 500 वर्षांनंतर दिवाळीत अनेक राजयोग तयार होत आहेत. शनीचं कुंभ राशीत थेट भ्रमण झाल्यामुळे षष्ठ योग तयार होत आहे. त्याचबरोबर मंगळ आणि सूर्याचा संयोगही राजयोग निर्माण करत आहे. तसेच तूळ राशीतील आयुष्मान योग आणि बुधादित्य राजयोगामुळे अनेक राशींवर देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे. 

रविवारी देखील सर्वार्थ सिद्धी योग असणं विशेष फलदायी मानलं जातं. सर्वार्थ सिद्धी योगात केलेली सर्व कार्यं सफल होतात. खरेदीपासून ते पॉलिसी, बँकिंग इत्यादी सर्व गोष्टींसाठी हे खूप शुभ मानलं जातं. वृषभ, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांना ग्रह-ताऱ्यांच्या शुभ संयोगाचा विशेष लाभ होईल.

Diwali 2023 : दिवाळीपर्यंत हे योग येतील

रवि पुष्य योग - रविवार 5 नोव्हेंबर 2023
अमृत योग, कुमार योग - सोमवार 6 नोव्हेंबर 2023
कुमार योग - मंगळवार 7 नोव्हेंबर 2023
अमृत योग - बुधवार 8 नोव्हेंबर 2023
अमृत योग - गुरुवार 9 नोव्हेंबर 2023
प्रीति योग - शुक्रवार 10 नोव्हेंबर 2023
सर्वार्थ योग - रविवार 12 नोव्हेंबर 2023
सर्वार्थ सिद्धी योग- मंगळवार 14 नोव्हेंबर 2023

Diwali Puja timings 2023 : दिवाळी पूजेसाठी शुभ मुहूर्त

यंदा दिवाळीची पूजा 12 नोव्हेंबरला संध्याकाळी होणार आहे. पूजेचा शुभ मुहूर्त 12 नोव्हेंबरला सायंकाळी 5.40 ते 7.36 पर्यंत आहे, लक्ष्मी-गणेशाच्या पूजेचा हा शुभ मुहूर्त आहे. ज्योतिषांच्या मते, या शुभ मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात अपार सुख आणि समृद्धी येते.

Diwali 2023 : वसुबारसपासून भाऊबीजेपर्यंत सर्व तारखा

9 नोव्हेंबर - वसुबारस
10 नोव्हेंबर - धनत्रयोदशी
11 नोव्हेंबर - मासिक शिवरात्री
12 नोव्हेंबर - दिवाळी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, अभ्यंगस्नान (पहिली अंघोळ)
13 नोव्हेंबर - सोमवती अमावस्या
14 नोव्हेंबर - दीपावली पाडवा, बलिप्रतिपदा, गोवर्धन पूजन, अन्नकुट
15 नोव्हेंबर - भाऊबीज

हेही वाचा:

Diwali 2023 : धनत्रयोदशीला दुर्मिळ कलात्मक राजयोग! 'या' राशींच्या लोकांवर पडणार पैशांचा पाऊस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget