![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Diwali 2023 : धनत्रयोदशीला दुर्मिळ कलात्मक राजयोग! 'या' राशींच्या लोकांवर पडणार पैशांचा पाऊस
Dhanteras 2023: राजयोग हा अत्यंत शुभ मुहूर्त असून यामुळे धनत्रयोदशीला काही विशिष्ट राशींना प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. देवी लक्ष्मी या राशींवर प्रसन्न असेल.
![Diwali 2023 : धनत्रयोदशीला दुर्मिळ कलात्मक राजयोग! 'या' राशींच्या लोकांवर पडणार पैशांचा पाऊस Diwali 2023 Rare Rajyog on Dhanteras or Dhantrayodashi 2023 These zodiac signs will get laxmi blessing increase money in diwali Diwali 2023 : धनत्रयोदशीला दुर्मिळ कलात्मक राजयोग! 'या' राशींच्या लोकांवर पडणार पैशांचा पाऊस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/15/da034da31845649eb8f27a4840e68b111665834056095560_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Diwali 2023 : हिंदू पंचांगानुसार, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष त्रयोदशीला धनत्रयोदशी (Dhanteras 2023) साजरी केली जाते. या दिवशी धनदात्री देवी लक्ष्मी आणि आरोग्यदेवता धन्वंतरीची पूजा केली जाते. यंदा 12 नोव्हेंबरला दिवाळीचं (Diwali 2023) लक्ष्मीपूजन आहे आणि त्याआधी दोन दिवस, म्हणजेच 10 नोव्हेंबरला धनत्रयोदशी आहे. हा दिवस ग्रहमानानुसार देखील अत्यंत अनुकूल असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा धनत्रयोदशीला चंद्र हा कन्या राशीत गोचर करणार आहे. कन्या राशीत शुक्र देव अगोदरच विराजमान आहेत. शुक्र आणि चंद्राच्या एकत्र येण्याने 10 नोव्हेंबरला कलात्मक राजयोग निर्माण होत आहे. त्यात हस्त नक्षत्रात हा राजयोग येत असल्याने तीन राशींच्या लोकांवर लक्ष्मी देवीची कृपा होणार आहे.
मकर रास (Capricorn Zodiac)
कलात्मक राजयोग मकर राशीसाठी वरदान ठरणार आहे. शनी आणि गुरुदेवाचा उत्तम पाठबळ असल्याने धनलाभ होईल. प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी महत्त्वाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात येणार आहे. नोकरी-व्यवसायात मिळालेल्या नव्या जबाबदाऱ्यांना तुम्ही संपूर्ण न्याय द्याल. विद्यार्थ्यांसाठी हा राजयोग यश आणि प्रगती घेऊन येणार आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचे असल्यास संधी सोडू नका. कामासंबंधात तुमचे निर्णय योग ठरणार आहेत. प्रवासाचे योगही आहेत. अचानक तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे.
कन्या रास (Virgo Zodiac)
कलात्मक योग हा कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. यामुळे तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल. तुमच्यातील कलागुणांना वाव मिळेल. नोकरी-व्यवसायात महत्वाचे निर्णय घेताना तज्ज्ञ मंडळींचा सल्ला लाभकारक ठरेल. तुमचा आत्मविश्वास दुप्पटीने वाढणार आहे. या काळात तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होणार आहे. तुमचं बँक बॅलेन्स घसघशीत वाढणार आहे. तुमचं मानसिक आरोग्य या काळात सुधारणार आहे. जोडीदारासोबत आनंददायी वेळ तुम्ही घालवणार आहात. तुम्हाला जोडीदाराकडून प्रचंड पाठबळ मिळू शकतं, यातून धनलाभाचं दार सुद्धा उघडेल .
कर्क रास (Cancer Zodiac)
कर्क राशीच्या भाग्यस्थानात कलात्मक राजयोग प्रभावी असणार आहे. हा योग कुंडलीत नवमस्थानात असल्याने खूप भाग्यशाली ठरणार आहे. प्रॉपर्टी संबंधातील कामे मार्गी लागतील. जुनी येणी येतील. कलात्मक योगामुळे तुमची अनेक कामं मार्गी लागणार आहेत. आरोग्यात सुधारणा होईल. या काळात एक सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये असणार आहे. तुमची सकारात्मक ऊर्जा अडचणीवर मात करण्यात यशस्वी होणार आहे. विशेष म्हणजे मनाचा उत्साह वाढेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Ruchak Rajyog: दिवाळीत 'या' राशींवर मंगळाची कृपा; होणार धनलाभ, पैसा अनेक पटींनी वाढणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)