दीपवीरच्या घरी नवा पाहुणा येणार, सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या मुलांची रास, भविष्य, स्वभाव कसा असतो?
लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिका पदुकोण-रणवीर सिंहने गुडन्यूज दिली आहे. सप्टेंबर महिन्यात दीपिका आणि रणवीरच्या घरी पाहुणा येणार आहे.
Deepika Padukone-Ranveer Singh: अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) व रणवीर सिंह बॉलीवूडमधील (Deepika Padukone-Ranveer Singh Announce First Pregnancy ) लोकप्रिय कपल आहे. दीपिका व रणवीर लवकरच आई-बाबा होणार आहेत. दीपिकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज दिली आहे. दीपिकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ‘सप्टेंबर 2024’ असे लिहिले आहे. दीपिकाची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या गुडन्यूजनंतर चाहत्यांबरोबरच बॉलीवूडमधील अनेक मंडळी तिचे अभिनंदन करताना दिसत आहेत.
लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिका पदुकोण-रणवीर सिंहने गुडन्यूज दिली आहे. सप्टेंबर महिन्यात दीपिका आणि रणवीरच्या घरी पाहुणा येणार आहे. या पाहुण्याच्या स्वागतासाठी दीपिका, रणवरसह संपूर्ण बॉलीवूड सज्ज झाले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या मुलं ही गॉड गिफ्ट असतात. बुद्धीमान,सर्जनशील तसेच सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या मुले त्यांच्या आयुष्यात कायम यशस्वी होतात. वेगवेगळ्या महिन्यांत जन्मलेल्या मुलांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व वेगवेगळे असते. प्रत्येक व्यक्तीची राशी वेगवेगळी असते आणि राशीचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर दिसून येतो. सप्टेंबर महिन्यात दिपिका आणि रणवीरचे बाळ येणार आहे. आज आपण सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांच्या स्वभावाविषयी जाणून घेणार आहोत.
स्पष्टवक्ते आणि मनाने अतिशय कुशाग्र
जन्मतारीख आणि ग्रह-ताऱ्यांच्या हालचालींचा परिणाम मुलांच्या स्वभावावर दिसून येतो. सर्व मुलांचे स्वभाव वेगळे असतात. काही मुले आनंदी असतात, तर काही मुले रागावतात. ज्योतिष शास्त्रानुसार, सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांना इतरांकडून त्यांची स्तुती ऐकणे खूप आवडते. गर्दीत आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात हे लोक यशस्वी होतात. ते अतिशय स्पष्टवक्ते आणि मनाने अतिशय कुशाग्र आहेत. या महिन्यात जन्मलेल्या मुलांमध्ये विनोदबुद्धी देखील अद्भुत असते. इतरांचे लक्ष कसे वेधायचे हे चांगले जाणतात .तसेच लोकांना हसवण्याची एक कला आहे. या व्यक्तीच्या सहवासात व्यक्ती कायम आनंदी राहतात.
शास्त्रानुसार या महिन्यात जन्मलेली मुले खूप व्यवहारी असतात. प्रत्येक काम गांभीर्याने घेतात. लोक भविष्यात चांगले शास्त्रज्ञ, चांगले शिक्षक, सल्लागार आणि राजकारणी ठरतात. या महिन्यात जन्मलेले लोक आपले विचार इतरांसोबत शेअर करत नाहीत.
चूक आणि फसवणूक सहन होत नाही
सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक त्यांच्या लव्ह लाईफ तसेच त्यांच्या करिअरबद्दल खूप जागरूक असतात. आपले नाते पूर्ण प्रामाणिकपणे जपावे. या लोकांना फसवणूक अजिबात सहन होत नाही. तुमच्या जोडीदारावर खूप प्रेम करा. ही मुले कौटुंबिक जीवनातही उत्कृष्ट असतात. जे त्यांच्या आयुष्यात खास आहेत त्यांची ते खूप काळजी घेतात. या कारणास्तव ते खास असतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :