Chanakya Niti : वय फक्त आकडा नाही हो! सुखी संसारासाठी वय महत्त्वाचं, लग्न करताना एवढं अंतर तर हवंच;चाणक्याने सांगितलंय कारण
Chanakya Niti For Marriage : वैवाहिक जीवनात आनंद हवा असेल तर या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे. विशेषत: लग्न करताना वयामधील अंतराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे आचार्य चाणक्यांनी सांगितले आहे.
![Chanakya Niti : वय फक्त आकडा नाही हो! सुखी संसारासाठी वय महत्त्वाचं, लग्न करताना एवढं अंतर तर हवंच;चाणक्याने सांगितलंय कारण Chankaya Niti For marriage How much Distance Should be in Husband and Wife tips Marathi News Chanakya Niti : वय फक्त आकडा नाही हो! सुखी संसारासाठी वय महत्त्वाचं, लग्न करताना एवढं अंतर तर हवंच;चाणक्याने सांगितलंय कारण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/ace97599eee4f5be40b4707a23a6056d171956146465789_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Chanakya Niti For Marriage : चाणक्य नीतिचा (Chanakya Niti) वापर आजही अनेकजण करतात. वैयक्तिक आयुष्यात यश मिळवण्यासाठी या चाणक्य नीतिला अवलंब अनेकजण करतात. लग्न कोणतेही असू दे अरेंज की लव्ह पण सगळ्यात कॉमन विचारला जाणरा प्रश्न म्हणजे दोघांच्या वयात किती अंतर आहे? घरातील ज्येष्ठ मंडळी कायम सांगतात की मुलगी ही मुलापेक्षा लहान असावी. आपण अशा गोष्टी नेहमी ऐकत आलेलो आहोत.नव्या पिढीतील मुले तर एज जस्ट नंबर म्हणून या प्रश्न टाळतात. पण तुम्हाला माहित आहे का, आचार्य चाणक्य सांगतात तुम्हाला वैवाहिक जीवनात आनंद हवा असेल तर या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे. विशेषत: लग्न करताना वयामधील अंतराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, चला तर आज जाणून घेऊया सुखी संसारासाठी आचार्य चाणक्यांनी काय सांगितले आहे.
विवाह हा एक आध्यात्मिक अनुभव
सुखी संसारासाठी आचार्य चाणक्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहे. आचार्य चाणक्य म्हणतात, लग्न हे एक आदर्श सामाजिक-धार्मिक नाते आहे. विवाह हा एक आध्यात्मिक अनुभव आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की, यशस्वी विवाह म्हणजे ज्यामध्ये पती-पत्नी एकमेकांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या संतुष्ट करतात.
पती-पत्नीमध्ये जास्त अंतर नसावे...
आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की, लग्न करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की पती-पत्नीच्या वयात जास्त अंतर नसावे. शारीरिकदृष्ट्या सक्षम पुरुषच आपल्या पत्नीच्या आकांक्षा पूर्ण करू शकतो. अशा परिस्थितीत पती आणि पत्नीमध्ये जर जास्त अंतर असेल तर तो पत्नीला मानसिक आणि शारीरिक सुख देऊ शकत नाही. आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की जर पत्नीची इच्छा पूर्ण झाली नाही तर ती दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होऊ शकते आणि त्यामुळे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे.
आचार्य चाणक्य यांनी वैवाहिक नातेसंबंधांवर देखील भाष्य केलं आहे. असं म्हणतात की, नवरा बायकोचं नातं हे फक्त एका जन्मासाठीच नाही तर पुढच्या सातही जन्मासाठी बांधलं गेलं आहे. पती-पत्नी म्हणजे एका रथाची दोन चाकं आहेत.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :
Chanakya Niti : उपाशी राहिलात तरी चालेल पण बायकोला कधीच सांगू नका 'चार' गोष्टी; चाणक्य सांगतात, नाहीतर सुखी आयुष्याला लागेल नजर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)