Chandra Grahan 2022 : वृश्चिक राशीत वर्षातील पहिले चंद्रग्रहण, 'या' राशीवर राहणार अनेक महिने प्रभाव
Chandra Grahan 2022 : ज्योतिषीय वेळेच्या गणनेनुसार 16 मे रोजी वृश्चिक राशीमध्ये चंद्रग्रहण होत आहे. त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांवर त्याचा विशेष प्रभाव राहील.
Chandra Grahan 2022 : चंद्रग्रहण ही खगोलीय घटना आहे. यामध्ये पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते. त्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्रग्रहण होते. या वर्षातील पहिले चंद्रग्रहण (Chandra Grahan 2022 on Scorpio) वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 16 मे रोजी होणार आहे.
ज्योतिषीय वेळेच्या गणनेनुसार, 16 मे रोजी वृश्चिक राशीमध्ये चंद्रग्रहण होत आहे. त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांवर त्याचा विशेष प्रभाव राहील. हे ग्रहण 7:02 ते 12:20 पर्यंत चालेल. परंतु हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. चंद्रग्रहणाच्या नऊ तास आधी हा सुतक काळ मानला जात असला तरी वैशाख पौर्णिमेला होणारे हे चंद्रग्रहण भारताच्या कोणत्याही भागात दिसणार नाही. त्यामुळे त्याचा सुतक काळ वैध राहणार नाही.
या काळात वृश्चिक राशीच्या लोकांच्या व्यवसायात व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे व्यवहारात सावधगिरी बाळगा. नोकरी शोधणाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. वृश्चिक राशीच्या लोकांना शारीरिक रोग, मानसिक रोग आणि इतर सर्व प्रकारच्या समस्यांसारख्या वैयक्तिक समस्यांना देखील सामोरे जावे लागू शकते.
हे करू नका
वैशाख महिन्यातील पौर्णिमेला वृश्चिक राशीत होणाऱ्या ग्रहणात वृश्चिक राशीच्या लोकांनी कोणतेही काम घाईगडबडीत करू नये. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. व्यवसायात सावध राहा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या :
- Horoscope Today, May 7, 2022 : कर्क, कन्यासह ‘या’ राशींनी वादापासून दूरच राहा! जाणून घ्या आजचे राशीभविष्य...
- 'या' राशीच्या लोकांना त्रास देण्यासाठी येणार शनि, चुकूनही करून नका 'हे' काम
- Mars Transit 2022 : 'या' राशींच्या लोकांच्या वाढणार अडचणी
- Astrology : 'या' राशींच्या व्यक्ती पैशांचा करतात योग्य वापर