एक्स्प्लोर

Horoscope Today, May 7, 2022 : कर्क, कन्यासह ‘या’ राशींनी वादापासून दूरच राहा! जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

Horoscope Today, May 7, 2022 :  वृषभ, मकर, मीन राशींना कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. मिथुन, कुंभ राशींना गुंतवणूक करताना काळजी घ्यावी लागणार आहे.

Horoscope Today, May 7, 2022 : आज कृतिका नक्षत्र आहे. चंद्र वृषभ राशीत आहे. शनि आज कुंभ राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. सूर्य मेष राशीत आहे. वृषभ, मकर, मीन राशींना कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. मिथुन, कुंभ राशींना गुंतवणूक करताना काळजी घ्यावी लागणार आहे. जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : काही अनोळखी व्यक्तींपासून सावध राहावे लागेल, अन्यथा ते तुमच्या समस्या वाढवू शकतात. मित्राच्या मदतीने व्यवसाय वाढू शकतो. मनःशांती लाभेल. कामात उत्साह राहील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. पैसा मिळू शकतो. भौतिक संपत्तीत वाढ होईल. तुमचे उत्पन्न अपेक्षेप्रमाणे वाढेल. राजकारण्यांना फायदा होईल. नवीन वाहन खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल.

वृषभ (Taurus Horoscope) : नोकरीत तुमची प्रगती होईल. आरोग्य चांगले राहील. आजचा दिवस कुटुंबातील सदस्यांसह आनंदमय होईल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. कामामुळे प्रवास करावा लागू शकतो. उत्पन्न वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. भौतिक सुविधांचा विस्तार होईल. व्यवसायात बदल होण्याची शक्यता आहे. प्रगतीचे मार्ग मिळतील. वादविवादांपासून दूर राहा.  

मिथुन (Gemini Horoscope) : व्यवहारात सावधगिरी बाळगली पाहिजे, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात. कुटुंबातील समस्यांमुळे तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला नंतर त्रास होईल. एकतर्फी विचार टाळा आणि सर्वांना सोबत घेऊन निर्णय घ्या. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळू शकतात. कार्यक्षेत्रातही बदल होऊ शकतो. काम जास्त होईल. पैशाची आवक वाढेल. प्रेमात मतभेद होऊ देऊ नका.

कर्क (Cancer Horoscope) : प्रलंबित कामे पूर्ण होतील. नोकरीत तुमची प्रगती होईल. मन प्रसन्न राहील. आत्मविश्वास वाढेल. नोकरीसाठी परदेशात जाण्याची शक्यता आहे. अधिक धावपळ होईल. नोकरीत काही अतिरिक्त जबाबदारी येऊ शकते. काम जास्त होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. कुटुंबातील ज्येष्ठ आणि लहान सर्वांचा आदर करणे अनिवार्य आहे.

सिंह (Leo Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी खर्चाने भरलेला असेल. अतिरिक्त खर्चामुळे तुमचे मन अस्वस्थ होईल. व्यवसायाशी संबंधित काही अनुभव आज तुम्हाला उपयोगी पडतील. व्यवसायात नुकसान होऊ शकते. मन अस्वस्थ होऊ शकते. कुटुंबासमवेत कोणत्याही धार्मिक स्थळी जाण्याचे योग आहेत. मित्रांचे सहकार्य मिळेल. खर्चात वाढ होईल. मानसिक असंतोष वाढू शकतो. मनावर नकारात्मक विचारांचाही प्रभाव राहील.

कन्या (Virgo Horoscope) : उत्पन्नात अपेक्षेप्रमाणे वाढ होईल. प्रकृती चांगली राहील. प्रवासात तुम्हाला फायदा होईल. आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. आत्मविश्वास वाढेल. मन प्रसन्न राहील. व्यवसायात सुधारणा होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. वाद टाळण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात. मान-सन्मान मिळेल. आरोग्याकडे थोडे लक्ष देण्याची गरज आहे.

तूळ (Libra Horoscope) : सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना काही चांगली माहिती मिळू शकते. व्यवसायात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. रागाचा अतिरेक टाळा. मित्राच्या मदतीने पैसे मिळू शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. स्वभावात चिडचिडेपणा राहील. कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे. नोकरीत तुमची प्रगती होईल.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : नोकरीत प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. संभाषणात संयम ठेवा. जास्त राग राग करणे टाळा. आरोग्याबाबत सावध राहा. आज एखादे रखडलेले काम पूर्ण होईल. तुमचे आरोग्य चांगले राहील. नोकरीशी संबंधित लोकांना मनाप्रमाणे काम मिळाल्याने आनंद होईल. परंतु, नोकरीच्या ठिकाणी काही नवीन शत्रू निर्माण होऊ शकतात.

धनु (Sagittarius Horoscope) : कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. मन चंचल राहील. व्यवसायात बदल होण्याची शक्यता आहे. लाभाच्या संधी मिळतील. अतिरिक्त खर्चामुळे तुम्ही त्रस्त व्हाल. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची शक्यता आहे. व्यावसायिक स्थिती चांगली राहील. पैसा येत राहील. मात्र, कोणतीही आर्थिक जोखीम घेऊ नका.

मकर (Capricorn Horoscope) : जीवनसाथीचा सहवास मिळेल. नोकरीत तुमची प्रगती होईल. आर्थिक लाभ होऊ शकतो. वडिलधाऱ्यांच्या आशीर्वादाचा लाभ होईल. मालमत्तेतून पैसे मिळू शकतात. नोकरीमध्ये दुसऱ्या ठिकाणी जावे लागू शकते. खर्च जास्त होईल. मानसिक ताण टाळा. उत्पन्न वाढेल. तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कोणत्याही प्रकारचे वाद टाळण्याचा प्रयत्न करा.

कुंभ (Aquarius Horoscope) : गुंतवणुकीचे नियोजन काळजीपूर्वक करावे लागेल. कोणाच्या सांगण्यावरून पैसे गुंतवू नका. पैशाच्या कमतरतेमुळे काही कामे थांबू शकतात. कामात निष्काळजीपणामुळे नोकरी धोक्यात येईल. आळस वाढू शकतो. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. कुटुंबात शांतता राखण्याचा प्रयत्न करा. मनात निराशा आणि असंतोषाची भावना राहील.

मीन (Pisces Horoscope) : प्रेमात मतभेद होऊ शकतात. वायफळ खर्च करणे टाळा. कौटुंबिक कामात व्यस्त राहाल. राजकारणात यश मिळण्याची चिन्हे आहेत. संभाषणात संयम ठेवा. व्यवसायात वाढ होईल. प्रवासामुळे खर्च वाढू शकतो. वडिलांचे सहकार्य मिळेल. तणाव टाळण्याचा प्रयत्न करा. यश मिळवण्यासाठी शॉर्टकट घेणे टाळा. आज केलेला प्रवास फायदेशीर ठरेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Pune Election : पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
BJP Chhatrapati Sambhajinagar : गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Embed widget