एक्स्प्लोर

Chandra Grahan 2022 : उद्या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण, जाणून घ्या तुमच्या शहरात कधी दिसणार?

Chandra Grahan 2022 : त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी मंगळवारी, 08 नोव्हेंबर रोजी, 2022 वर्षातील शेवटचे ग्रहण देशात आणि जगात दिसणार आहे.

Chandra Grahan 2022 : 2022 वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण (Chandra Grahan 2022) कार्तिक पौर्णिमेला (Kartik Purnima) होणार आहे. या वर्षातील हे दुसरे चंद्रग्रहण असेल. भारतात त्रिपुरारी पौर्णिमेच्या (Tripurari Purnima) दिवशी यंदा खग्रास चंद्रग्रहण आहे. जेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये पृथ्वी येते तेव्हा चंद्रग्रहण होते. भारतात चंद्रग्रहण दिसल्यामुळे त्याचा सुतक कालावधी वैध असेल. देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये संपूर्ण चंद्रग्रहण दिसणार आहे, तर इतर ठिकाणी आंशिक चंद्रग्रहण दिसेल. 08 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी चंद्र उगवताच त्याच वेळी भारतात चंद्रग्रहण दिसणार आहे. 


चंद्रग्रहणाच्या वेळा, सुतककाळ आणि वेध काळ 
त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी मंगळवार, 08 नोव्हेंबर रोजी, 2022 वर्षातील शेवटचे ग्रहण देशात आणि जगात दिसणार आहे. हे ग्रहण संपूर्ण चंद्रग्रहण असेल. भारतामधील चंद्रग्रहणाची सर्वसाधारण वेळ ही संध्याकाळी 5 वाजून 32 मिनिटं ते 7 वाजून 27 मिनिटं इतकी आहे. चंद्रग्रहण हे ग्रस्तोदित असल्याने 8 नोव्हेंबर दिवशी सूर्योदयापासून मोक्षापर्यंत म्हणजेच संध्याकाळी 6 वाजून 19 मिनिटांपर्यंत ग्रहणाचे वेध पाळले जातील. लहान मुलं, आजारी व्यक्ती, अशक्त व्यक्ती, गरोदर स्त्रिया यांच्याकरिता वेध पाळण्याचा कालावधी सकाळी 11 वाजल्यापासून सूर्यास्तापर्यंत असणार आहेत. ग्रहण ही सामान्य खगोलीय घटना असली तरीही शास्त्रानुसार ग्रहणाच्या वेळेस काही नियम पाळण्याची रीत आहे.


भारताशिवाय 'या' ठिकाणी दिसणार चंद्रग्रहण 
भारताशिवाय 8 नोव्हेंबरला होणारे चंद्रग्रहण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया आणि पॅसिफिकमध्ये दिसणार आहे. हे चंद्रग्रहण कार्तिक पौर्णिमेला देव दीपावलीच्या तारखेला होईल, आम्ही तुम्हाला सांगतो की 25 ऑक्टोबर रोजी झालेले वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण देखील दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी कार्तिक अमावस्या तिथीला झाले होते. हे चंद्रग्रहण भारतात संध्याकाळी दिसणार आहे.


भारतात चंद्रग्रहण किती वाजता सुरू होईल?
चंद्रग्रहणाची तारीख: 08 नोव्हेंबर, सोमवार 2022
चंद्रग्रहण वेळ: संध्याकाळी 05.32 ते 07.27 पर्यंत
चंद्रोदयाची वेळ - 08 नोव्हेंबर संध्याकाळी 5:28 वाजता

तुमच्या शहरात कधीपासून सुरू होणार चंद्रग्रहण?

शहर         कधी सुरू      शहर        कधी सुरू
दिल्ली            5.28        नोएडा       5.30
अमृतसर        5.32        लखनौ       5.16
भोपाळ          5.36        लुधियाना    5.34
जयपूर           5.37        शिमला       5.20
मुंबई             6.01        कोलकाता   4.52
रायपूर           5.21        पाटणा        5.00
इंदूर              5.43        डेहराडून    5.22
उदयपूर         5.49        गांधीनगर    5.55

भारतात कुठे दिसणार चंद्रग्रहण?
दिवाळीनंतर आता कार्तिक पौर्णिमेलाही चंद्रग्रहण दिसणार आहे. १५ दिवसांच्या अंतराने हे दुसरे ग्रहण असेल. हे संपूर्ण चंद्रग्रहण भारतात पाहता येणार आहे. भारताच्या काही भागांमध्ये संपूर्ण चंद्रग्रहण दिसेल तर बहुतांश भागांमध्ये आंशिक चंद्रग्रहण दिसेल. भारतात ग्रहणाची सुरुवात 08 नोव्हेंबर रोजी चंद्रोदयाने होईल.

येथे संपूर्ण चंद्रग्रहण देशात दिसणार
भारतात 08 नोव्हेंबरच्या संध्याकाळी चंद्र उगवताच, पहिले चंद्रग्रहण ईशान्य दिशेला दिसेल. पहिले पूर्ण चंद्रग्रहण अरुणाचल प्रदेशात दिसणार आहे.

देशाच्या 'या' भागांमध्ये आंशिक चंद्रग्रहण दिसणार 

आंशिक चंद्रग्रहण ईशान्येचा भाग वगळता भारताच्या बहुतांश भागात दिसणार आहे.

संपूर्ण चंद्रग्रहण येथे पाहता येईल
वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक महासागर, हिंद महासागर, ईशान्य युरोप, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या बहुतांश भागात दिसणार आहे.

वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण येथे दिसणार नाही
08 नोव्हेंबर रोजी ग्रहण दक्षिण पश्चिम युरोप आणि आफ्रिकेत दिसणार नाही.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

संबंधित बातम्या

 Chandra Grahan 2022 : 'या' राशींसाठी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण ठरणार अशुभ, चुकूनही करू नका 'हे' काम

महत्त्वाच्या बातम्या

Shardiya Navratri 2026: हिरवीगार की खुंटलेली वाढ? घटस्थापनेच्या रोपामागे दडलाय 'हा' खास संकेत! शेवटी रोपांचे काय करतात? धार्मिक महत्त्व, लोकपरंपरा...
हिरवीगार की खुंटलेली वाढ? घटस्थापनेच्या रोपामागे दडलाय 'हा' खास संकेत! शेवटी रोपांचे काय करतात? धार्मिक महत्त्व, लोकपरंपरा...
Shardiya Navratri 2026: तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात 253 किलो सोने, 4,523 किलो चांदी! माहिती अधिकारातून ऐतिहासिक ठेव्याची माहिती समोर
तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात 253 किलो सोने, 4,523 किलो चांदी! माहिती अधिकारातून ऐतिहासिक ठेव्याची माहिती समोर
Shardiya Navratri 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन..नवरात्रौत्सवाचे शेवटचे 6 दिवस गेमचेंजर! अद्भूत योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन..नवरात्रौत्सवाचे शेवटचे 6 दिवस गेमचेंजर! अद्भूत योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
Horoscope Today 13 October 2026: आज 13 ऑक्टोबरचा दिवस भाग्याचा कि टेन्शनचा? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात कसे बदल होणार? आजचे सविस्तर राशीभविष्य..
आज 13 ऑक्टोबरचा दिवस भाग्याचा कि टेन्शनचा? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात कसे बदल होणार? आजचे सविस्तर राशीभविष्य..

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
कोल्हापूर : तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
Rohit Pawar and Vikram Pachpute: विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
Eknath Shinde: मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
Raju Shetti: ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
Soybean Rates Today: दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Embed widget