Chanakya Niti : आयुष्यात कधी अपयश आल्यास सिंहाकडून शिका 'या' महत्त्वाच्या गोष्टी, यशस्वी होण्याचा उत्तम मार्ग; चाणक्य सांगतात...
Chanakya Niti : चाणक्यांनी प्राण्यांच्या गुणाबद्दलही नितीशास्त्रात उल्लेख केला आहे. जंगलाचा राजा असलेल्या सिंहाकडून आपण नेमक्या कोणत्या गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेच ते जाणून घेऊयात.

Chanakya Niti : आचार्य चाणाक्य हे भारतातील अशा गुरुंपैकी एक आहेत ज्यांची शिकवण आणि त्यांची मूल्य आजही लोक आचरणात आणतात. नितीशास्त्रात चाणक्यांच्या (Chanakya Niti) जीवनातील प्रत्येक गोष्टींबाबत सांगण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे, चाणक्यांनी प्राण्यांच्या गुणाबद्दलही नितीशास्त्रात उल्लेख केला आहे. जंगलाचा राजा असलेल्या सिंहाकडून आपण नेमक्या कोणत्या गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेच ते जाणून घेऊयात.
आयुष्यात अपयश आल्यास सिंहाकडून शिका 'या' महत्त्वाच्या गोष्टी
1. सिंहाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो कधीच कोणाला घाबरत नाही. सिंहाचं हे नेतृत्वगुण लक्षात घेता आपणही निडर असणं गरेजचं आहे. तसेच, आपल्यातील धैर्य आणि साहसाने वर्चस्व बनवता आलं पाहिजे.
2. ज्याप्रमाणे सिंह एकजूट होऊन शिकार करतो. त्याप्रमाणेच, सिंहाची ही कला आपण शिकून घेतली पाहिजे. कामाच्या ठिकाणी टीमवर्कमध्ये काम करणं फार गरजेचं आहे.
3. सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं. अशा वेळी त्याच्या अंगी असलेले कुशल नेतृत्व गुण आपण नक्कीच शिकून घेतले पाहिजेत. यामुळे तुम्ही जीवनात पुढे जाऊ शकता.
4. परिस्थिती कोणतीही असो हिंमत हारायची नाही. हा एक महत्त्वाचा गुण सिंहाच्या अंगी आहे तो आपण नक्कीच आत्मसात केला पाहिजे. कारण अनेकजण अपयशाला घाबरतात आणि माघार घेतात. प्रयत्नच करत नाहीत. त्यामुळे असं न करता जर आपलं ध्येयावर लक्ष असेल तर यश सहज गाठता येतं.
5. ज्याप्रमाणे सिंह आपल्या कुटुंबियांच्या संरक्षणासाठी नेहमी तत्पर असतो. त्याप्रमाणेच आपणही आपल्या कुटुंबियांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणं गरजेचं आहे.
6. ज्याप्रमाणे सिंह प्रत्येक कामाला योग्य न्याय देतो. त्याप्रमाणेच आपणही आपल्या कामाच्या बाबतीत दक्ष असणं गरजेचं आहे. आपल्या कामाच्या प्रती प्रेम आणि प्रामाणिकपणा असणं गरजेचं आहे.
7. सिंह कधीही शिकार करताना चांगली रणनीती आखतो. त्याप्रमाणेच आपल्यालाही कोणतंही नवीन काम हाती घेताना रणनीती आखणं गरजेचं आहे.
8. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे सिंहाकडून आपल्याला आपल्या आजूबाजूच्या गोष्टींना लक्षपूर्वक पाहण्याची आणि ऐकण्याची सवय असली पाहिजे. थोडक्यात, आपल्याकडे निरिक्षण क्षमता असावी.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांकडे चिक्कार असतो पैसा, पण फक्त 'इथं' खातात माती; लाख प्रयत्न करुनही मिळत नाही यश
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

