Chaitra Navratri 2024 : नवरात्रीचा आणि 9 मूलांकचा नेमका काय संबंध? या जन्मतारखेच्या लोकांना देवीचा मिळतो खास आशीर्वाद
Chaitra Navratri 2024 : नवरात्रीमध्ये 9 या क्रमांकाचे विशेष महत्त्व आहे. देवीच्या नऊ रूपांपैकी पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते.
Chaitra Navratri 2024 : चैत्र नवरात्रीचा (Chaitra Navratri) उत्साह सध्या सगळीकडे पाहायला मिळतोय. या दिवसांत दूर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. या दिवसात देवीची (Devi) पूर्ण भक्तीभावाने पूजा केल्याने भक्ताच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात असं म्हणतात. नवरात्रीमध्ये 9 या क्रमांकाचे विशेष महत्त्व आहे. देवीच्या नऊ रूपांपैकी पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते.
दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते. तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी कुष्मांडा देवी, नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता, सहाव्या दिवशी देवी कात्यायनी, सातव्या दिवशी कालरात्री, आठव्या दिवशी महागौरी आणि माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. महानवमीची नऊ रूपे शक्ती, धैर्य, सौम्यता, शौर्य इत्यादी दर्शवतात.
मूलांक 9 असलेल्या लोकांना आईचा विशेष आशीर्वाद असतो.
मातेच्या नऊ रूपांमुळे मूळ क्रमांक 9 असलेल्या लोकांना देवीचा विशेष आशीर्वाद असतो. कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 9 असतो. या मूलांक संख्या असलेल्या लोकांचा शासक ग्रह मंगळ आहे, जो धैर्य, ऊर्जा, सामर्थ्य इत्यादींचा कारक मानला जातो. मंगळाबरोबरच या लोकांवर देवी दुर्गेचाही विशेष आशीर्वाद असतो.
कुंडलीत मंगळ कमजोर असेल तर नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीची स्तुती करणे लाभदायक ठरते. विशेषत: नवरात्रीच्या पाचव्या दिवशी आई स्कंदमातेची पूजा केल्याने कुंडलीतील मंगळाची स्थिती मजबूत होते.
9 क्रमांकाचे लोक काय पसंत करतात?
ज्या व्यक्तीचा मूलांक 9 आहे तो मंगळाच्या प्रभावाखाली असतो. अशी व्यक्ती धैर्यवान, कुशाग्र, बुद्धिमान आणि मेहनती असते. कोणत्याही परिस्थितीला सहजपणे सामोरे जाण्यात ते पटाईत असतात. त्यांच्या धैर्याने आणि कठोर परिश्रमाने ते जीवनात उच्च स्थान प्राप्त करतात. ते खूप दानशूर असतात. जरी यांचं व्यक्तित्व संतापजनक असलं तरी एखाद्याची समस्या स्वतःची म्हणून स्वीकारून, ते इतरांना मदत करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :