Capricorn Weekly Horoscope 4 To 10 March : मकर राशीच्या लोकांचा खर्च या आठवड्यात वाढणार; आरोग्यही जपण्याची गरज, जाणून घ्या साप्ताहिक राशिभविष्य
Capricorn Weekly Horoscope 4 To 10 March 2024: मकर राशीसाठी नवा आठवडा कसा असेल? करिअर, आर्थिक स्थिती कशी राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Capricorn Weekly Horoscope 4th To 10th March: राशीभविष्यानुसार, 4 मार्च फेब्रुवारी ते 10 मार्च 2024 हा आठवडा खास आहे. हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? या काळात तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या...
मकर राशीचे करिअर (Capricorn Career Horoscope)
नोकरदार या आठवड्यात कामात व्यस्त असतील. जर तुम्ही नोकरी सोडण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आधी दुसरी नोकरी शोधा. जॉब पोर्टलवर तुमचा प्रोफाईल अपडेट करा. व्यावसायिकांसाठी हा आठवडा चांगला असेल, तुम्हाला एक चांगली डील मिळू शकते. व्यवसायात सुधारणा आणि प्रगती होईल. व्यवसायाच्या निमित्ताने लांबचा प्रवास होऊ शकतो.
मकर राशीची आर्थिक स्थिती (Capricorn Wealth Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आठवड्याचे मधले दिवस खर्चाने भरलेले असतील. तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करू शकता. इच्छा पूर्ण झाल्यामुळे मन आनंदी राहील. हा आठवडा आर्थिक दृष्टिकोनातून संमिश्र असणार आहे. मकर राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला चांगलं उत्पन्न कमवतील.
मकर राशीची कौटुंबिक स्थिती (Capricorn Family Horoscope)
आठवड्याच्या सुरुवातील वैवाहिक जीवनात काही वाद होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी जोडीदारासोबतचे वाद संपतील आणि प्रेम वाढेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंद घ्याल. जोडीदाराकडून पाठिंबा आणि आर्थिक मदत मिळू शकते. तुमच्या मुलांनाही प्रगतीच्या भरपूर संधी मिळतील.
मकर राशीचे लव्ह लाईफ (Capricorn Love Horoscope)
नवीन आठवड्यात तुमच्यात आणि तुमच्या प्रियकरामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. नात्यातील लहानसहान वाद नीट हाताळा, प्रकरण हाताबाहेर जाऊ देऊ नका.
मकर राशीचे आरोग्य (Capricorn Health Horoscope)
या आठव्यात तुमच्या पायाला दुखापत होण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीकोनातून तसा हा आठवडा वेळ चांगला आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :