Capricorn Weekly Horoscope 15 To 21 July 2024 : मकर राशीच्या लोकांना नवीन आठवड्यात सावधानतेचा इशारा; वाचा तुमचं साप्ताहिक राशीभविष्य
Capricorn Weekly Horoscope 15 To 21 July 2024 : नवीन आठवडा मकर राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी मकर राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Capricorn Weekly Horoscope 15 To 21 July 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, जुलै महिन्यातला तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा मकर राशीसाठी नेमका कसा असणार आहे? करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा मकर राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी मकर राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मकर राशीची लव्ह लाईफ (Capricorn Love Horoscope)
नात्यात तुमची वचनबद्धता महत्त्वाची ठरेल. नातं दीर्घकाळ टिकवण्यासाठी संवादाची आवश्यकता असते. तुम्ही तुमच्या पालकांशी तुमच्या नातेसंबंधांबद्दल बोलू शकता आणि त्यांचा पाठिंबा मिळवू शकता. अविवाहित मकर राशीचे लोक त्यांच्या आधीच्या प्रियकराकडे परत जाऊ शकतात. विवाहित मकर राशीच्या लोकांनी ऑफिस रोमान्स टाळावा.
मकर राशीचे करिअर (Capricorn Career Horoscope)
तुम्हाला नोकरी बदलायची असल्यास या आठवड्यात तुम्ही जॉब पोर्टलवर तुमचा प्रोफाईल अपडेट करू शकता. तुम्ही टीम प्रोजेक्टचे लीडर असाल तर ऑफिसमध्ये संयम ठेवा. टीम मीटिंगमध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्टी सादर करा आणि नवीन कामं पूर्ण करण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्याल, याची खात्री करा. मॅनेजनेंटच्या गुड बुकमध्ये राहा आणि कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा. लोक तुमची कल्पना स्वीकारतील. उद्योजक नफ्याबाबत तणावमुक्त राहतील.
मकर राशीची आर्थिक स्थिती (Capricorn Wealth Horoscope)
नवीन आठवड्यात खर्चावर नियंत्रण ठेवा. तुमच्याकडे पैसे येतील आणि तुम्ही सर्व प्रलंबित थकबाकी भरण्यास सक्षम असाल. भावंडांशी असलेले किरकोळ आर्थिक वाद मिटवावे लागतील. तुम्ही सहलीचं नियोजनही करू शकता. काही महिलांना घर किंवा कार खरेदी करण्यात यश मिळेल. एखादा गरजू मित्र किंवा भावंड आर्थिक मदतीसाठी विचारेल, ज्याला तुम्ही नकार देऊ शकत नाही.
मकर राशीचे आरोग्य (Capricorn Health Horoscope)
कोणतीही मोठी आरोग्याची समस्या तुम्हाला भेडसावणार नाही. तथापि, काही जणांना विषाणूजन्य ताप आणि किरकोळ दुखापतींचा त्रास होऊ शकतो. गर्भवती महिलांनी प्रवास करताना किंवा बसमध्ये चढताना काळजी घ्यावी. ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी अतिरिक्त सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :