Shadashtak Yog : दिवाळीआधीच 'या' 3 राशींवर संकटांचे ढग; पाण्यासारखा बरबाद होणार पैसा, खर्च-कर्ज वाढणार
Budh Guru Shadashtak Yog : दिवाळीपूर्वी बुध-गुरु एकत्र येत षडाष्टक योगाची निर्मिती करत आहेत, जे 3 राशींसाठी अशुभ सिद्ध होऊ शकतं. या 3 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Mercury Jupiter Shadashtak Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध आणि गुरु हे दोन्ही अतिशय शुभ ग्रह मानले जातात. ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रहाचा वाणी, बुद्धिमत्ता आणि व्यवसायावर प्रभाव पडतो. तर गुरूचा विवाह, मुलं, ज्ञान आणि धर्माशी संबंधित गोष्टींवर प्रभाव पडतो. या दोन ग्रहांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सुख-समृद्धी नांदते. परंतु जेव्हा हे ग्रह संक्रमण करतात तेव्हा काही राशींना समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
वैदिक ज्योतिष गणनेनुसार, बुध सध्या तूळ राशीत आणि गुरु वृषभ राशीत विराजमान आहे. यामुळे दोन्ही ग्रह एकमेकांपासून सहाव्या आणि आठव्या घरात आहेत, ज्यामुळे षडाष्टक योग तयार होत आहे. ज्याचा मुख्यत्वे 3 राशींवर नकारात्मक प्रभाव पडेल. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीचे लोक या काळात चिडचिडे आणि सदा रागात असू शकतात. छोट्या-छोट्या गोष्टींवरून तुम्हाला राग येऊ शकतो. यावेळी संयम बाळगा आणि कोणताही निर्णय घेण्यात घाई करू नका. या काळात तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अनावश्यक खर्च वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या पदोन्नतीला विलंब होऊ शकतो. व्यवसायात नुकसान होऊ शकतं. कामात अडथळे येण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे वाद होऊ शकतात. घरामध्ये तणावही वाढू शकतो. आरोग्याबाबत सावध राहा.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीचे लोक यावेळी चिंतेत आणि अस्वस्थ राहू शकतात. मनात अशांत वाटू शकतं. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणं तुम्हाला कठीण जाईल. व्यवसायात अडथळे येऊ शकतात. व्यवसायात मंदीचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक नुकसान आणि कर्ज वाढण्याचीही शक्यता आहे. नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी विचारपूर्वक पावलं उचला. विद्यार्थ्यांना अभ्यास करावासा वाटणार नाही. घरातील वातावरण देखील तणावपूर्ण असेल, ज्यामुळे कौटुंबिक संबंध बिघडू शकतात. तुमचे तुमच्या जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. वैवाहिक जीवनात मतभेद होऊ शकतात.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते. अचानक खर्च वाढू शकतो, ज्यामुळे पैशाची समस्या निर्माण होऊ शकते. नोकरीत तुम्हाला चढ-उतारांना सामोरं जावं लागू शकतं. सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. वादापासून दूर राहा. विद्यार्थ्यांसाठी हा काळ कठीण असू शकतो. घरामध्ये तणावाचं वातावरण वाढू शकतो. वैवाहिक जीवनातही समस्या निर्माण होऊ शकतात. प्रवास करताना काळजी घ्या. करिअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :