Astrology : तब्बल 30 वर्षांनंतर कुंभ राशीत होणार बुध आणि शनीची युती; 'या' राशींना येणार अच्छे दिन, करिअर आणि व्यवसायात मिळणार यश
Shani And Budh Yuti : ज्योतिषशास्त्रानुसार, तब्बल 30 वर्षांनंतर बुध आणि शनीचा संयोग होणार आहे. याचा तीन राशींच्या लोकांना विशेष फायदा होणार आहे.
Shani And Budh Yuti : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह हे विशिष्ट कालावधीत दुसऱ्या ग्रहांमध्ये प्रवेश करतात; ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि जगावर दिसून येतो. सध्या शनिदेव कुंभ राशीत भ्रमण करत आहेत आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला बुध ग्रह देखील कुंभ राशीत प्रवेश करेल, त्यामुळे तब्बल 30 वर्षांनंतर कुंभ राशीत शनी आणि बुध यांची युती होईल. या युतीचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर दिसून येईल. परंतु, मुख्यत्वे 3 राशींंना शनी आणि बुधाच्या युतीचा फायदा होणार आहे. या भाग्यवान राशींबद्दल (Zodiac Signs) जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini)
कर्मदाता शनि आणि बुध यांची युती मिथुन राशीसाठी अनुकूल ठरू शकते, यामुळे तुमचे नशीब उजळू शकते. करिअरमध्ये तुम्हाला यश मिळेल. या काळात तु्म्ही करिअरमध्ये प्रगती करू शकता. काही परदेशी डीलच्या मदतीने तुम्हाला फायदा मिळू शकेल. तुम्ही कामा-व्यवसायाशी संबंधित प्रवास करू शकता; जो तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी बुध आणि शनीचा संयोग अनुकूल ठरू शकतो. जर तुम्ही विवाहित असाल, तर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात चांगलं सुख मिळेल. तुम्ही जोडीदाराच्या अगदी जवळ याल. तसेच जे अविवाहित आहेत, त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तुम्हाला या काळात तुमच्या करिअरमध्ये बरेच सकारात्मक परिणाम मिळू शकतात. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला उत्तम संधी मिळू शकतात. त्याचबरोबर शनिदेवाने तुमच्या राशीत षष्ठ महापुरुष राजयोग निर्माण केला आहे, त्यामुळे तुमचे दैनंदिन उत्पन्न वाढून तुमचा सन्मान आणि प्रतिष्ठा देखील वाढू शकते.
कुंभ रास (Aquarius)
शनि आणि बुधाची युती कुंभ राशीसाठी फायदेशीर ठरू शकेल. तुमच्या राशीच्या चढत्या घरात हे ग्रह एकत्र येत आहेत. शनिदेव तुमच्या राशीचा स्वामी देखील आहे, त्यामुळे या काळात तुमच्यात शिकण्याची आवड निर्माण होईल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर आर्थिक नियोजनासाठी हा काळ खूप उत्तम काळ करू शकता. तुमचे वैवाहिक जीवन आनंददायी असेल, तसेच यावेळी बुध ग्रहाच्या प्रभावामुळे तुम्हाला काम आणि व्यवसायात फायदा होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Astrology : पुढील एक महिन्यापर्यंत 'या' राशींना सोन्याचे दिवस; नशीब देणार साथ, होणार धन लाभ