Baba Vanga : बाबा वेंगाची भविष्यवाणी! जुलै 2025 मध्ये ग्रहांच्या हालचालींमुळे येणार मोठ्ठं संकट; मिळतील 'हे' संकेत
Baba Vanga : बाबा वेंगा यांनी ग्रहांच्या हालचालींशी संबंधित काही संकेत दिले आहेत.

Baba Vanga : जुलै 2025 हा एक असा महिना आहे जो इतिहास, खगोलशास्त्र आणि भविष्यवाणीच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. याच संदर्भात भविष्यकार बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी आपली भविष्यवाणी सांगितली आहे. आजवर बाबा वेंगा यांनी विनाश, युद्ध, राजकीय अस्थिरता, आर्थिक संकट, महामारी या संदर्भात भाष्य केलं आहे. नुकतंच त्यांनी ग्रहांच्या हालचालींशी संबंधित काही संकेत दिले आहेत.
ग्रहांच्या चालीचा भयानक संकेत
गुरु अस्त (9 जून ते 7 जुलै 2025)
मिथुन राशीत गुरु ग्रह अस्त झाल्याने नीती, धर्म, विवेक आणि नेतृत्वक्षमता कमी पडते. गुरुच्या अस्त अवस्थेत समाज दिशाहीन होतो. त्यामुळे हा काळ काही राशींच्या लोकांसाठी फार आव्हानात्मक ठरु शकतो.
शनी वक्री (13 जुलै ते 30 नोव्हेंबर 2025)
मीन राशीत शनी वक्री होणार आहे. शनीची वक्री अवस्था व्यवस्था, सत्ता आणि न्यायव्यवस्थेत संकटांचा संकेत देते. त्यामुळे शनीच्या वक्री अवस्थेत काही राशींच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे.
गुरु अतिचार
गुरु ग्रह मिथुन राशीत अतिचारी गतीत आहे. यामुळे निर्णय घेण्यात भ्रम आणि नीतीमत्तेत अस्थिरता येते. त्याचबरोबर, मंगळ ग्रहाची दृष्टीसुद्धा मिथुन राशीत असणार आहे. यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















