Astrology : आज धन योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; वृषभसह 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव, शनी देणार लाभच लाभ
Astrology Panchang Yog 8 February 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.

Astrology Panchang Yog 8 February 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 8 फेब्रुवारी शनिवारचा म्हणजेच आजचा दिवस हा शनीदेवाला (Shani Dev) समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी जया एकादशीचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. आजच्या शुभ मुहूर्तावर धन योगाचा (Yog) शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस राशींसाठी अत्यंत खास असणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज तुम्हाला चांगला आर्थिक लाभ मिळेल. तसेच, विविध स्त्रोतांमधून तुम्हाला उत्पन्नाच्या संधी निर्माण होतील. आज तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू देखील मिळण्याची शक्यता आहे. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. तसेच, बिझनेसमध्ये देखील चांगली कमाई होईल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्ही ठरवलेली सर्व कामे वेळेनुसार पूर्ण होतील. त्यामुळे तुम्ही समाधानी असाल. तसेच, आर्थिक परिस्थिती तुमची चांगली असेल. तुम्हाला कोणाकडूनही पैसे मागावे लागणार नाहीत. आज दिवसभरात तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होईल. तसेच, कामाच्या ठिकाणी वातावरण चांगलं पाहायला मिळेल. मित्रांचा तसेच कुटुंबियांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. आज तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला चांगला लाभ मिळेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. देवी लक्ष्मीची तुमच्यावर चांगली कृपा असून विविध स्त्रोतांमधून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा चांगला विस्तार झालेला पाहायला मिळेल. जोडीदाराबरोबर तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात देखील करु शकता.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज तुमच्या कामाचं चांगलं प्रदर्शन तुम्हाला दाखवता येईल. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. आज तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तसेच, तुम्ही नियोजित केलेली कामे वेळेत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Horoscope Today 8 February 2025 : आज 'या' 3 राशींवर असणार शनीदेवाची कृपा, इच्छित फळ शनी देणार; वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

