Astrology : आज गजकेसरी योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; मेषसह 'या' 5 राशींना अपेक्षेपेक्षा जास्त मिळणार लाभ, मिळणार मोठ्ठा दिलासा
Astrology Panchang Yog 24 April 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांवर होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.

Astrology Panchang Yog 24 April 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 24 एप्रिलचा दिवस म्हणजेच गुरुवारचा दिवस. आज चैत्र कृष्ण एकादशीचा शुभ संयोग जुळून आला आहे. तसेच, आजच्या शुभ राशींवर भगवान विष्णूची कृपा असणार आहे. तसेच, आज ब्रह्म योगासह पूर्वा भाद्रपद नक्षत्राचा देखील शुभ संयोग जुळून आला आहे. त्याचबरोबर आज गजकेसरी योगदेखील जुळून आला आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांवर होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. या राशींच्या लोकांवर भगवान विष्णूची विशेष कृपा असणार आहे. तसेच, तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. मित्रांचा चांगला सहवास तुम्हाला लाभेल. आज तुम्ही एखाद्या नवीन कामाची सुरुवात करु शकता. आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करु शकता.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. या राशीला भाग्याची चांगली साथ मिळेल. तसेच, तुमचा व्यवसाय अगदी सुरळीत चालेल. संपत्तीत चांगली वाढ होताना दिसेल. आज तुम्हाला समाजात चांगला मान-सन्मान मिळेल. जोडीदाराबरोबर तुम्ही छान वेळ घालवाल. संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात घालवा.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. तुमच्या कामकाजात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशात देखील जाण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ फार शुभ असणार आहे. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. या काळात तुमच्या आजाराकडे दुर्लक्ष करु नका.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस फार लाभदायक असणार आहे. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तसेच, आज कोणताही निर्णय घेताना घरातील ज्येष्ठ व्यक्तीचं मत विचारात घ्या. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमची परिस्थिती अनुकूल असणार आहे. तसेच, कोर्ट-कचेरीच्या संदर्भातील तुमचे जुने वाद लवकरच संपतील. धनसंपत्तीत चांगली वाढ पाहायला मिळेल. जोडीदाराचा चांगला सपोर्ट तुम्हाला पाहायला मिळेल. समाधानी असाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















