Astrology : आज लक्ष्मी नारायण योगासह जुळून आला अनेक शुभ योगांचा संयोग; तूळसह 'या' राशींना अचानक होणार धनलाभ, संपत्तीत दुप्पट वाढ
Astrology Panchang Yog 22 August 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस 5 राशींसाठी फार शुभ असणार आहे. त्यामुळे या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.

Astrology Panchang Yog 22 August 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 22 ऑगस्ट 2025 चा दिवस आहे. आजचा वार शुक्रवार आहे. तसेच, हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. आज चंद्राने सिंह राशीत संक्रमण केलं. तसेच, आजच्या दिवशी अनेक शुभ योग जुळून आले आहेत. आज कलानिधी योग, सुनफा योग आणि लक्ष्मी नारायण योगासह अनेक शुभ योग जुळून आले आहेत. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे. आजच्या शुभ राशींवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस 5 राशींसाठी फार शुभ असणार आहे. त्यामुळे या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. या राशींवर काही जबाबदाऱ्या वाढतील. मात्र, तुम्ही त्या प्रामाणिकपणे पूर्ण कराल. तसेच, घरातील लोकांबरोबरही थोडा वेळ संवाद साधा. आजच्या दिवशी कोणतीच मोठी देवाणघेवाण करु नका. तसेच, दूरचा प्रवास करताना काळजी घ्या.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी आजचा दिवस फार आनंदाचा असणार आहे. आज तुमचं व्यक्तिमत्व उठून दिसेल. तसेच, समाजात तुम्हाला चांगला मान सन्मान मिळेल. समाजसेवकाच्या कार्यात तुम्ही सहभागी व्हाल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. कुटुंबात शांती टिकून राहील.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी आजचा दिवस फार शुभकारक असणार आहे. खाजगी क्षेत्रातील लोकांना चांगला लाभ मिळेल. तसेच, देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. नवीन लोकांशी भेटीगाठी होतील. आज नशिबाची साथ तुमच्याबरोबर असणार आहे.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस फार लकी असणार आहे. आज तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तसेच, देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. आज तुमच्या काही प्रतिष्ठीत लोकांबरोबर भेटीगाठी होतील. तसेच, धार्मिक कार्यात तुमचा सहभाग दिसेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी आजचा दिवस मंगलमयी असणार आहे. आज तुम्हाला अनपेक्षित लाभ मिळेल. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही फार उत्सुक असाल. तसेच, तुमच्या ध्येयावर तुमचं लक्ष केंद्रित राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :


















