Astrology : आज गुरु पुष्य योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; तूळसह 'या' 5 राशींना अचानक होणार धनलाभ, देवी लक्ष्मीची कृपा
Astrology Panchang Yog 17 August 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजच्या दिवशी जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.

Astrology Panchang Yog 17 August 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 17 ऑगस्ट 2025 चा दिवस आहे. आजचा दिवस हा सूर्यदेवाला समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी चंद्राने कर्क राशीत संक्रमण केलं आहे. त्यामुळे आज त्रिग्रही योग जुळून आला आहे. आजच्या दिवशी पुष्य नक्षत्राच्या शुभ संयोगासह गुरु पुष्य योग तसेच, सिद्ध योग निर्माण झाला आहे. यामुळे अनेक राशींसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजच्या दिवशी जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रगती होईल. तसेच, तुमचं मन आज प्रसन्न असणार आहे. कामाच्या निमित्ताने तुम्हाला बाहेर जावं लागू शकते. वैवाहिक जीवन सुखी असेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा झालेली दिसेल. तसेच, अनेक भौतिक सुख सुविधांचा तुम्ही लाभ घ्याल. जोडीदाराबरोबर तुमचे नाते अधिक घट्ट होईल. तसेच, मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळण्याची शक्यता आहे.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. दत्तगुरुंना कृपेने तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. तसेच, नवीन कार्यात तुमचं मन रमेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता देखील आहे. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना लवकरच प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. भावा बहिणीबरोबर चांगले संबंध निर्माण होतील.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज समाजातील काही खास व्यक्तीशी तुमच्या गाठीभेटी होतील. तसेच, तुमच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. एकूणच जोडीदाराबरोबर तुमचा व्यवहार चांगला राहील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली असून देवी लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद असणार आहे. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, तुम्ही एखादी नवीन वस्तूची खरेदी करु शकता. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















