Astrology : आज संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जुळून आला सर्वार्थ सिद्धी योग; मेषसह 'या' 5 राशींवर राहील गणरायाची कृपा
Astrology Panchang Yog 16 February 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.

Astrology Panchang Yog 16 February 2025 : आज 16 फेब्रुवारीचा दिवस म्हणजेच संकष्ट चतुर्थीचा (Sankasht Chaturthi) दिवस आहे. तसेच, आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. तसेच, आजच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी योगाचा (Yog) देखील शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तसेच, तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. आज तुमच्या व्यवसायाचा विस्तार चांगला वाढलेला दिसेल. तसेच, तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण असेल. एकूणच आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असणार आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. आज तुमच्यामध्ये भरपूर उत्साह भरलेला दिसून येईल. तसेच, देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. आज तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तसेच, लवकरच तुमच्या घरी शुभ कार्याचं आयोजन केलं जाऊ शकतं. कुटुंबातील नातेवाईकांशी तुमच्या भेटीगाठी होतील.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमच्या कुटुंबियातील सदस्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, सामाजिक कार्यात तुमच्या कार्याचा चांगला विस्तार झालेला पाहायला मिळेल. भौतिक सुख-सुविधांचा तुम्हाला चांगला लाभ घेता येईल. तसेच, तुम्ही नवीन वाहनाची देखील खरेदी करु शकता.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. आज तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. तसेच, भौतिक सुख-सुविधांचा तुम्हाला चांगला आनंद घेता येईल. संध्याकाळचा वेळ तुम्ही धार्मिक कार्यात घालवाल. तसेच, विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ फार महत्त्वाचा असणार आहे. समाजात तुमचा चांगला मान-सन्मान वाढलेला दिसेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. सर्वार्थ सिद्धी योगाचा तुम्हाला चांगला लाभ मिळणार आहे. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तुमच्या व्यवसायाचा चांगला विस्तार झालेला दिसेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं चांगलं कौतुक केलं जाईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















