Astrology : आज चंद्र मंगळ योगासह जुळून आले अनेक शुभ योग; 'या' 5 राशींवर राहणार सूर्यदेवाची कृपा, मनातील सर्व इच्छा होणार पूर्ण
Panchang 30 June 2024 : आज रविवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, याचा 5 राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे. मिथुनसह 5 राशींवर आज सूर्यदेवाची विशेष कृपा राहील, आजचा दिवस लाभाचा असेल. आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Astrology 29 June 2024 : ग्रहांच्या स्थितीनुसार, आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज रविवार, 30 जुलै रोजी चंद्र मीन राशीनंतर मेष राशीत जाणार आहे, ज्यामुळे चंद्राचा मंगळाशी संयोग होऊन चंद्र मंगळ योग तयार होईल. तसेच आज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची नववी तिथी असून या दिवशी चंद्र मंगळ योगासह सुकर्म योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रेवती नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा लाभ मिळेल. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini)
आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे. आज तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. तुमच्या करिअरमधील सर्व अडथळे दूर होतील आणि प्रगतीच् मार्ग मोकळे होतील. रविवारच्या सुट्टीमुळे आज दिवसभर व्यापारी व्यस्त राहणार असल्याने त्यांना चांगला नफाही मिळणार आहे. आज तुम्हाला सरकारी योजनेतून अचानक पैसे मिळू शकतात आणि धार्मिक कार्यातही तुमची रुची वाढेल. वैवाहिक जीवनाविषयी बोलायचं झालं तर, तुमच्या जोडीदारासोबत काही मतभेद असतील तर ते आज संपुष्टात येईल आणि नात्यात गोडवा वाढेल.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा लाभदायक राहील. कन्या राशीचे लोक आज पूर्णपणे रिलॅक्स मूडमध्ये असतील आणि मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेतही आखतील. आज तुम्हाला मित्राकडून अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. आज नशिबाने साथ दिल्यास या राशीच्या व्यावसायिकांना चांगले आर्थिक लाभ मिळतील आणि तुमची सर्व कामं सहज पूर्ण होतील. तुमच्या भावंडांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील आणि एकत्र तुम्ही घरातील कामं सहज पूर्ण करू शकाल. संध्याकाळचा वेळ एखाद्या धार्मिक स्थळी व्यतीत होईल, ज्यामुळे मानसिक शांती मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. वृश्चिक राशीचे लोक आज प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करतील आणि यशस्वीही होतील. जर तुम्ही शिक्षक असाल किंवा एखाद्या प्रकारे लोकांना मार्गदर्शन करत असाल तर आज तुम्ही तुमच्या क्षेत्रात यशस्वी व्हाल. आज व्यावसायिकांना चांगला नफा होण्याची शक्यता आहे आणि ते इतर काही व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचारही करतील. या राशीच्या ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे त्यांना आज या दिशेने शुभ संकेत मिळतील.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी असणार आहे. मकर राशीचे लोक आज पैशाची बचत करतील. आज अनेक खास लोकांशी तुमची ओळख वाढेल आणि तुमचे सोशल सर्कल वाढेल. इतरांना मदत करण्यासाठी तुम्ही पुढे असाल. सासरच्या घरात काही त्रास होत असेल तर आज तो दूर होईल आणि मानसिक तणावातूनही आराम मिळेल. नोकरदार लोक रविवारी पूर्णपणे रिलॅक्स मूडमध्ये असतील. तुमच्या मुलाच्या लग्नात जो अडथळा येत होता तो आज संपुष्टात येईल, त्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल.
कुंभ रास (Aquarius)
आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांचं संवाद कौशल्य वाढेल आणि तुम्ही तुमच्या बोलण्याने लोकांना आकर्षित करू शकता. तुम्हाला जीवनात सर्व प्रकारचं भौतिक सुख मिळेल आणि धार्मिक कार्यातही सक्रिय सहभाग घ्याल. आज रविवारच्या सुट्टीमुळे व्यावसायिकांना नफा मिळवण्याच्या अनेक उत्तम संधी मिळतील आणि आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील सततच्या अडचणी दूर करण्यासाठी शिक्षकांचं पूर्ण सहकार्य मिळेल, त्यामुळे अभ्यासात रस कायम राहील. घरातील राहिलेली कामं पूर्ण करण्यात दिवस जाईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: