Astrology Panchang 26 September 2024 : आज जुळून आला गुरु पुष्य योगाचा शुभ संयोग; तूळसह या 5 राशींच्या सौभाग्यात होणार वाढ
Astrology Panchang 26 September 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशीच्या लोकांवर होणार आहे.
Astrology Panchang 26 September 2024 : आज 26 सप्टेंबरचा दिवस फार खास असणार आहे. आजच्या दिवशी गुरु पुष्य योग (Guru Pushya Yog) जुळून आला आहे. त्याचबरोबर, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. आजच्या दिवशी गुरु पुष्य योगासह (Yog) अमृत सिद्धी योग आणि पुनर्वसु नक्षत्र योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशीच्या लोकांवर होणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ फार चांगला ठरणार आहे. भगवान विष्णूच्या कृपेने तुमची सर्व कार्य चांगली होतील. आयुष्यात सकारात्मक दृष्टीकोन राहील. तुमच्या समस्यांचं लवकर निराकरण होईल. तसेच, कामाच्या ठिकाणी नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज तुम्हाला नशीबाची पूर्ण साथ मिळेल. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. तरुणांना आज दिवसभरात गोड बातमी ऐकायला मिळेल. रखडलेली कार्य मार्गी लागतील.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायक असणार आहे. भगवान विष्णूच्या कृपेने तुमच्या सुख-समृद्धीत चांगली वाढ होईल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. तसेच, तुमची आर्थिक स्थिती मजबूत असल्या कारणाने तुम्हाला कोणत्याच गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही. दिवसभरात तुम्हाला खूप उत्साही वाटेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला असणार आहे. तुम्हाला नशिबाने साथ दिल्यास त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. आज तुम्ही व्यवसायात नवीन योजना राबवाल, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल. आज तुम्हाला अनावश्यक खर्चापासून मुक्ती मिळेल आणि पैसे कमवण्याचे नवीन मार्गही सापडतील.
मीन रास (Pisces Horoscope)
आजचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी शुभ आहे. आज तुमचं आरोग्य चांगलं असेल, तुम्ही दिवसभर उत्साही असाल आणि अनेक अपूर्ण घरगुती कामं पूर्ण कराल. आज तुम्हाला कामानिमित्त प्रवास करण्याची संधी मिळेल आणि पैशामुळे अडकलेली कामं पूर्ण होऊ लागतील. व्यवसाय करणाऱ्यांना आज सूर्यदेवाच्या कृपेने चांगला नफा मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: