Astrology : आज शिव योगासह बनले अनेक शुभ योग; कुंभसह 3 राशींना मोठा लाभ, अन्य मार्गाने भरघोस पैसा येणार
Panchang 23 October 2024 : आज बुधवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी शिव योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 3 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Astrology Panchang 23 October 2024 : आज बुधवार, 23 ऑक्टोबर रोजी चंद्र कर्क राशीत जाणार आहे. तसेच आज अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी असून या दिवशी शिवयोग, सिद्ध योग आणि पुनर्वसु नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 3 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. मिथुन राशीचे लोक आज काही क्रिएटिव्ह कामं करतील. आज नोकरी-व्यवसायात चांगले परिणाम मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि जुन्या कर्जातूनही मुक्तता मिळेल. या राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना आज त्यांच्या कामानुसार प्रमोशन मिळणार आहे आणि काही लोकांना चांगल्या संधीही मिळू शकतात. त्याच वेळी, आज व्यावसायिक त्यांच्या नियोजनावर खूप समाधानी दिसतील आणि त्यांना अनपेक्षित नफा देखील मिळू शकेल. तुम्ही जोडीदारासोबत दिवाळीनंतर कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करू शकता. संध्याकाळी लहान मुलं तुमच्यासोबत मस्ती करताना दिसतील, ज्यामुळे तुमचं सगळं टेन्शन क्षणात दूर होईल.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा लाभाचा आहे. आज तूळ राशीचे लोक बाप्पाच्या वेळेचा योग्य फायदा घेताना दिसतील आणि प्रत्येक संधीतून पैसे कमवण्याचा प्रयत्न करतील. आज तुम्ही अपूर्ण कामं अगदी सहजपणे पूर्ण कराल. जर तुम्ही खूप दिवसांपासून जमीन आणि मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आज तुम्हाला यश मिळेल. काही दिवसांपासून कुटुंबातील वातावरण खराब असेल, तर आज अचानक सकारात्मक बदल दिसून येतील आणि सर्वजण हसत-खेळत राहतील. संध्याकाळी मंदिर वैगरे धार्मिक स्थळाला भेट दिल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि आज तुमचं आरोग्यही चांगलं राहील.
कुंभ रास (Aquarius)
आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी आशेचा नवीन किरण घेऊन आला आहे. कुंभ राशीच्या लोकांना त्यांचे अडकलेले पैसे आज परत मिळू शकतात आणि त्यांना स्वतःसाठी ऑनलाईन शॉपिंग करता येईल. आज तुम्हाला अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या धनात वाढ होईल. जर तुम्ही आज काही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर भविष्यात त्यातून तुम्हाला खूप लाभ मिळेल. व्यावसायिकांना यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे, आज तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देऊ शकाल. विवाहयोग्य लोकांना आज चांगली स्थळं येऊ शकतात, कुटुंबात काही वाद सुरू असतील तर ते आज सुटतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: