एक्स्प्लोर

Astrology : आज धनलक्ष्मी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 'या' 5 राशींना होणार धनलाभ, राशीनुसार करा 'हे' अचूक उपाय

Panchang 23 March 2024 : आज, म्हणजेच 23 मार्च रोजी धनलक्ष्मी योग, रवि योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत, ज्यामुळे आजचा दिवस मेष, कर्क, सिंह राशीसह 5 राशींसाठी फलदायी ठरणार आहे. तसेच, शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे, त्यामुळे आज या 5 राशींवर शनिदेवाचीही शुभ दृष्टी असेल.

Astrology Today 23 March 2024 : आजचा दिवस ग्रहांच्या स्थितीमुळे फार महत्त्वाचा मानला जातो. आज, शनिवार, 23 मार्चला चंद्र सिंह राशीत प्रवेश करत आहे. तसेच आज फाल्गुन मासातील शुक्ल पक्षाची चतुर्दशी तिथी असून या दिवशी रवियोग, धनलक्ष्मी योग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे, त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा फायदा होणार आहे. या भाग्यवान 5 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया.

मेष रास (Aries)

आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी शुभ ठरेल. मेष राशीच्या लोकांचे कौटुंबिक संबंध आज घट्ट होतील आणि भाऊ आणि प्रिय व्यक्तीशी चांगला संवाद होईल. घरोघरी होळीची तयारी दिसून येईल. पैशाशी संबंधित काही प्रकरणांमध्ये आज निर्णय तुमच्या बाजूने होईल. होळीच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या मुलांसाठी आणि जोडीदारासाठी काही नवीन वस्तू किंवा कपडे खरेदी करू शकता, ज्यामुळे घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. आज तुमच्या घरात उत्साहाचं वातावरण असेल. नोकरी करणाऱ्यांना होळीच्या निमित्ताने काही भेटवस्तू मिळू शकतात आणि तुम्ही सहकाऱ्यांसोबत आज चांगला वेळ घालवाल. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी उत्तम असेल, होळीमुळे ते दिवसभर व्यावसायिक कामात व्यस्त असतील.

शनिवारचा उपाय : हनुमान मंदिरात जाऊन नैवेद्य अर्पण करा आणि हनुमान चालिसा आणि सुंदरकांड पठण करा.

कर्क रास (Cancer)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. कर्क राशीचे लोक काही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असतील तर शनिदेवाच्या कृपेने आज ते काम सुरू होऊ शकतं. होळीच्या निमित्ताने तुम्ही सर्जनशील कार्यात पूर्ण रस दाखवाल आणि मुलांसोबत चांगला वेळ घालवाल. कर्क राशीचे लोक घरी होळीची तयारी करतील आणि नवीन पदार्थांचा आनंदही घेतील. घरातील मुलं होळीच्या उत्साहात आनंदी राहतील. लहान मुलं तुमच्याकडे होळीच्या वस्तू मागतील, जर तुम्ही नाही दिले तरी ते हट्ट करतील. नोकरदार लोक आज ऑफिसमध्ये होळी पार्टीत सहभागी होऊ शकतात. आज व्यवसायात चांगली ऑर्डर मिळाल्याने व्यापारी दिवसभर व्यस्त राहतील आणि चांगला नफा कमावतील.

शनिवारचा उपाय : तुमचं नशीब उजळवण्यासाठी संध्याकाळी शमीच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.

सिंह रास (Leo)

आज सिंह राशीच्या लोकांच्या मानसन्मानात वाढ होईल. सिंह राशीचे लोक आज आनंदी असतील. आज तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल, ज्यामुळे तुमचे कुटुंबीय आनंदी राहतील आणि तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ देतील. लव्ह लाईफमध्ये सुरू असलेले गैरसमज आज दूर होतील आणि होळीच्या रंगांप्रमाणे आयुष्यातही अनेक रंग बहरतील. आज शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला अचानक धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. बऱ्याच दिवसांनी तुम्हाला एक जुना मित्र भेटेल, ज्यासोबत तुम्ही होळीचा आनंदही घेऊ शकता. या राशीचे काही नोकरदार लोक आज घरातून काम करू शकतात. त्याचबरोबर होळीमुळे व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.

शनिवारचा उपाय : शनिदेवावर मोहरीचं तेल अर्पण करा आणि सकाळ संध्याकाळ एक जपमाळ 'ॐ ऐं ह्लीं श्रीशनैश्चराय नम:' या मंत्राचा जप करा.

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना आज शनिदेवाच्या कृपेने सकाळपासून अनेक चांगल्या बातम्या मिळतील, ज्यामुळे तुमचा दिवस आनंदात जाईल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते, ते होळीनंतर नवीन नोकरीत जॉईन होऊ शकतात. वैवाहिक जीवनाविषयी बोलायचं झाल्यास, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल आणि तुमच्या मनातील भावना एकमेकांसमोर व्यक्त करताना दिसाल, यामुळे नात्यात अधिक गोडवा येईल. आज तुम्हाला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागेल, त्यासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार असाल. व्यावसायिक आज एका अशा व्यक्तीशी संबंध निर्माण करतील, जे भविष्यात फायदेशीर ठरतील.

शनिवारचा उपाय : शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी एका भांड्यात मोहरीच्या तेलात एक नाणं टाका आणि त्यात तुमचे प्रतिबिंब पहा. त्यानंतर ते तेल गरिबाला दान करा किंवा शनिदेवाच्या मंदिरात वाटीत ठेवा.

मकर रास (Capricorn)

आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी आनंदाचा असणार आहे. मकर राशीच्या लोकांना आज नशिबाची पूर्ण साथ मिळेल, आज तुमच्या अनेक समस्या दूर होतील आणि तुम्हाला चांगले आर्थिक लाभही मिळतील. घरोघरी होळीची तयारी सुरू होईल. व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल, ज्यामुळे ते भविष्यासाठी काही पैसे वाचवू शकतील. तुम्हाला अध्यात्मिक गोष्टींमध्ये पूर्ण रस असेल आणि तुम्ही काही पैसे धार्मिक कार्यात खर्च करू शकता. आज तुम्ही कुटुंबासोबत काही आनंदाचे क्षण घालवाल. तुम्ही तुमच्या भावा-बहिणींसोबत चांगला वेळ घालवाल.

शनिवारचा उपाय : शत्रूंपासून आणि मार्गातील अडथळ्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी भाकरीवर मोहरीचे तेल मिसळून काळ्या कुत्र्याला खाऊ घाला.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Numerology : प्रचंड हुशार आणि चतुर असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जिथे जातात तिथे होतं यांचं कौतुक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआत कांग्रेसची होकार, तर राष्ट्रवादीचा वेगळा सुर
ठाकरे गटाकडून मनपा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआच्या नेत्यांची प्रतिक्रिया
Mutual Fund : 1000 रुपयांच्या SIP नं गुंतवणूक सुरुवात केल्यास 1 कोटी रुपयांचा निधी किती वर्षात जमा होईल, जाणून घ्या समीकरण
एक हजार रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूक सुरु केल्यास कोट्यधीश व्हायला किती वर्ष लागू शकतात? जाणून घ्या समीकरण
Chandra Arya : कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad Shivsena : ठाकरे गटाचा निर्णय योग्य नाही, जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रियाSanjay Raut Full PC : मविआत भूकंप करणारी घोषणा! संजय राऊत काय म्हणाले? ABP MAJHAShivsena UBT Corporation Elections : महापालिकेत आम्ही स्वबळावर लढणार, Sanjay Raut यांची घोषणाTorres Scamआर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कार्यालयातील मुद्देमाल जप्ती, मुंबई पोलिसांची छापेमारी सुरूच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआत कांग्रेसची होकार, तर राष्ट्रवादीचा वेगळा सुर
ठाकरे गटाकडून मनपा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआच्या नेत्यांची प्रतिक्रिया
Mutual Fund : 1000 रुपयांच्या SIP नं गुंतवणूक सुरुवात केल्यास 1 कोटी रुपयांचा निधी किती वर्षात जमा होईल, जाणून घ्या समीकरण
एक हजार रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूक सुरु केल्यास कोट्यधीश व्हायला किती वर्ष लागू शकतात? जाणून घ्या समीकरण
Chandra Arya : कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
Nagpur Crime News : विदर्भातील सर्वात मोठी वीजचोरी उघड; राईस मिलकडून महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
विदर्भातील सर्वात मोठी वीजचोरी उघड; राईस मिलकडून महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नासाठी दबाव; गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला, दुसरा भाडेकरू येताच प्रकरणाला वाचा फुटली!
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नासाठी दबाव; गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला, दुसरा भाडेकरू येताच प्रकरणाला वाचा फुटली!
Cidco Homes : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणी करण्याची मुदत संपली, किती जणांनी अर्ज भरले, आकडेवारी समोर
सिडकोकडून तीन वेळा मुदतवाढ , 26000 घरांसाठी किती अर्ज आले? किमती जाहीर होताच अनेकांनी निर्णय फिरवला
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात EDची मोठी कारवाई, सुरेश कुटेची 1433 कोटीं संपत्ती घेतली ताब्यात..
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात EDची मोठी कारवाई, सुरेश कुटेची 1433 कोटीं संपत्ती घेतली ताब्यात..
Embed widget