Astrology : आज नवपंचम योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 5 राशींना मिळणार डबल लाभ, मार्गातील अडथळे होणार दूर
Panchang 19 November 2024 : आज मंगळवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी नवपंचम योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 5 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Astrology Panchang 19 November 2024 : आज मंगळवार, १९ नोव्हेंबर रोजी सूर्य आणि मंगळ एकमेकांपासून नवव्या आणि पाचव्या भावात स्थित राहणार आहेत, त्यामुळे सूर्य मंगळ नवम पंचम योग तयार होत आहे. तसेच आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील पाचवी तिथी असून या दिवशी नवम पंचम योग आणि अर्द्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries Horoscope Today)
आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायक आहे. आज मेष राशीच्या लोकांच्या आजूबाजूला सकारात्मक वातावरण असेल, त्यामुळे ते जे काही काम करतील, ते नव्या उत्साहाने करतील. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला असेल, भविष्यात तुम्हाला चांगला परतावा मिळेल. या राशीचे व्यावसायिक आज चांगला नफा कमवू शकतील. आज नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या करिअर क्षेत्रात उत्कृष्ट संधी मिळतील, ज्यामुळे त्यांच्या पगारात चांगली वाढ होईल. तुम्हाला आज तुमच्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट होईल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. आज तुमच्या बोलण्याच्या कौशल्याने तुमची अनेक महत्त्वाची कामं पूर्ण करू शकाल. आज गुंतवणुकीसाठी अनेक नवीन आणि आकर्षक संधी मिळण्याची शक्यता आहे, परंतु तज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज व्यवसाय करणारे नवीन डील करून नफा वाढवण्याचे काम करतील आणि ते इतरांसाठी चांगले प्रतिस्पर्धी सिद्ध होतील. रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांची प्रतीक्षा आज संपुष्टात येणार असून त्यांना मनासारखी नोकरी मिळेल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक दृष्टीकोनातून शुभ असणार आहे. आज तूळ राशीच्या लोकांच्या अनेक मनोकामना बाप्पाच्या कृपेने पूर्ण होतील. तुमच्या सासरच्या लोकांनी तुमच्याकडून पैसे घेतले असतील तर ते तुम्हाला आज परत मिळू शकतात. तुम्हाला भरपूर पैसे कमवण्याच्या उत्कृष्ट संधी मिळतील. व्यापारी आणि व्यावसायिकांना आज चांगली फायद्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. त्याच वेळी, नोकरी करणा-या लोकांचे आज अधिकाऱ्यांशी संबंध सुधारतील. आज तुम्ही खूप दिवसांनी एखाद्या मित्राला भेटू शकता. तुम्हाला संध्याकाळी संपूर्ण कुटुंबासह एका कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. धनु राशीचे लोक आज प्रत्येक कामात खूप सक्रिय दिसतील, ज्यामुळे तुम्ही महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकाल. तुम्हाला जुन्या आजारांपासूनही आराम मिळेल, ज्यामुळे तुम्हाला बरं वाटेल. आज तुम्ही तुमचं काही कर्ज फेडण्याचा प्रयत्न कराल, ज्यामध्ये तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. जर तुम्हाला जमीन आणि गाडी घ्यायची असेल तर हे स्वप्न आज पूर्ण होऊ शकतं. नोकरी आणि व्यवसायात असणारे आज कामाच्या ठिकाणी 100 टक्के देतील आणि आपल्या मेहनतीने सर्वांना प्रभावित करतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी आनंदाचा असणार आहे. आज तुमच्या जीवनात असे काही बदल होतील ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. घाबरण्याची गरज नाही, हे सकारात्मक बदल तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. तुम्ही कोणत्याही व्यक्तीकडून किंवा बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आज ते तुम्हाला सहज मिळू शकेल. जर लव्ह लाइफमधील लोक अद्याप आपल्या जोडीदाराला त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भेटवू शकले नसतील तर ते आज त्यांना भेटवतील, ज्यामुळे तुमच्या नात्याला मान्यता मिळण्यास मदत होईल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: