(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Astrology : आज ब्रम्ह योगासह जुळून आले अनेक शुभ योग; तूळसह 'या' 5 राशींच्या मार्गातील सर्व अडचणी होतील दूर
Astrology : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजच्या शुभ योगांचा परिणाम पाच राशींवर दिसून येणार आहे. या पाच राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
Astrology : आज 18 जुलैचा दिवस म्हणजेच गुरुवारचा दिवस हा अनेक अर्थांनी खास दिवस आहे. आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची द्वादशी तिथी आहे. त्याचबरोबर आज शुक्ल योग, ब्रम्ह योग, रवि योग, ज्येष्ठा नक्षत्र यांसारखे अनेक शुभ (Yog) संयोग जुळून आले आहेत. यामुळेच आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजच्या शुभ योगांचा परिणाम पाच राशींवर दिसून येणार आहे. या पाच राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. आज तुम्हाला अनेक महिन्यांच्या कालावधीनंतर तुमच्यावर येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळेल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. जर तुम्ही एखादी गुंतवणूक केली असेल तर त्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. सामाजिक कार्यात तुमची रुची आणखी वाढेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाकांक्षा पूर्ण करणारा असेल. तुम्ही पैशांची चांगली गुंतवणूक कराल. तसेच, अनावश्यक खर्च तुमच्याकडून होणार नाही याची तुम्ही काळजी घ्याल. तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती झालेली तुम्हाला दिसेल. वैवाहिक नात्याबद्दल बोलायचं झाल्यास, तुमचं जीवन अगदी आनंदात, सुरळीत सुरु असेल. लवकरच कुटुंबात एखाद्या शुभ कार्यक्रमाचं आयोजन करण्याची शक्यता आहे.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार लाभदायक असणार आहे. आज तुमची तुमच्या जवळच्या मित्राशी भेटीगाठी होतील. भगवान विष्णूच्या कृपेने तुमच्या धन-संपत्तीत चांगली वाढ पाहायला मिळेल. समाजातील ज्येष्ठ व्यक्तींशी तुमच्या भेटीगाठी होतील. तसेच, तुमची तब्येत चांगली असेल. आनंद द्विगुणित होईल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. धार्मिक कार्यात तुमचं मन जास्त रमेल. तसेच, तुम्ही जे काम करत आहात त्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबियांचा पाठिंबा मिळेल. तुम्हाला चांगला आर्थिक लाभ मिळेल. तसेच, परदेशात जाण्याची संधी देखील तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. जवळच्या व्यक्तीकडून तुम्हाला भेटवस्तू देखील मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. तुमचा शत्रू तुमच्याशी अचानक चांगलं वागू लागेल. पण याचा गैरफायदा घेऊ देऊ नका. स्वत:च्या कर्मावर विश्वास ठेवा. दिवसेंदिवस तुमच्या आरोग्यातही चांगली सुधारणा झालेली तुम्हाला दिसेल. कुटुंबात एखाद्या शुभ कार्यक्रमाचं आयोजन होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: