Astrology : आज रवि योगासह बनले अनेक शुभ योग; कुंभसह 'या' 5 राशींच्या धन-संपत्तीत होणार वाढ, राशीनुसार करा 'हे' अचूक उपाय
Panchang 17 March 2024 : आज, म्हणजेच 17 मार्च रोजी आयुष्मान योग, सौभाग्य योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत, ज्यामुळे आजचा दिवस मिथुन, कन्यासह 5 राशींसाठी शुभ ठरणार आहे. तसेच, रविवारचा दिवस हा ग्रहांचा राजा सूर्य देवाला समर्पित आहे, त्यामुळे या 5 राशींवर सूर्य देवाचीही कृपा राहील.
Astrology Today 17 March 2024 : आजचा दिवस ग्रहांच्या स्थितीमुळे फार महत्त्वाचा मानला जातो. आज, रविवार, 17 मार्चला चंद्र मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज फाल्गुन मासातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी असून या तिथीपासून होलाष्टक सुरू होतं. आजच्या दिवशी आयुष्मान योग, सौभाग्य योग, रवियोग आणि मृगाशिरा नक्षत्र यांचा शुभ संयोग होणार आहे, त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा फायदा होणार आहे. या भाग्यवान 5 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini)
आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप फलदायी ठरणार आहे. मिथुन राशीचे लोक आज कुटुंबातील सदस्यांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी होतील, आज नातेसंबंध अधिक घट्ट होतील. आज नोकरी-व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं तर, तुम्ही तुमच्या जोडीदारावर खूप प्रेम कराल, त्यांच्यासाठी काहीही करण्यास तुम्ही मागेपुढे पाहणार नाही. सूर्यदेवाच्या कृपेने आज व्यवसायात प्रगतीचे अनेक मार्ग खुले होतील आणि तुम्हाला परदेशातून चांगला नफा मिळेल, जो भविष्यासाठी उज्वल सिद्ध होईल. अविवाहित लोक एखाद्या कार्यक्रमात खास व्यक्तीला भेटतील आणि त्यांच्यासोबत डिनर प्लॅनही करतील.
उपाय : तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी वडाच्या पानावर तुमची इच्छा लिहा आणि वाहत्या पाण्यात सोडा.
कन्या रास (Virgo)
आजचा दिवस हा कन्या राशीच्या लोकांसाठी महत्त्वाचा असणार आहे. कन्या राशीचे लोक यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी आज कठोर परिश्रम घेतील आणि त्यांच्या करिअरच्या संदर्भात परदेश दौऱ्यावर जाण्याचेही संकेत आहेत. जर तुम्ही याआधी कोणाला पैसे दिले असतील तर आज तुम्हाला ते पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी तुमच्या मुलांच्या भविष्यासंबंधित काही चर्चा कराल, त्यांच्यासाठी एखाद्या योजनेत गुंतवणूक करण्याबद्दल तुम्ही बोलू शकता. रविवारच्या सुट्टीमुळे तरुणांना आज त्यांच्या प्रियकराला भेटता येईल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुमची नक्कीच प्रगती होईल आणि सकारात्मक परिणाम मिळतील. मुलांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि कुटुंबातील सदस्यांसोबतचे नाते अधिक घट्ट होतील.
उपाय : पैशाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी पाण्यात गूळ आणि तूप टाका आणि सूर्य चालिसा पठण करा.
वृश्चिक रास (Scorpio)
आज वृश्चिक राशीच्या लोकांना काही चांगली बातमी मिळेल. वृश्चिक राशीचे लोक लोककल्याणाच्या कामात सहभाग घेतील, कामाच्या ठिकाणी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील. प्रत्येक क्षेत्रात यशाचे नवे मार्ग तयार होतील आणि तुमचा धार्मिक कार्यात रस वाढेल. पूजा, भजन, कीर्तनाप्रती ओढ निर्माण होईल. या राशीचे नोकरदार लोक आज रविवारच्या सुट्टीचा आनंद घेतील आणि मित्रांसोबत वेळ घालवतील. तुमची ऊर्जा आणि आत्मविश्वास आज खूप जास्त असणार आहे, ज्यामुळे तुम्ही कोणतंही काम पूर्ण करण्यास मागेपुढे पाहणार नाही. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे घरात आनंदाचं वातावरण राहील.
उपाय : नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी तांब्याच्या भांड्यात तांदूळ आणि लाल फुलं टाकून सूर्यदेवाला अर्पण करा.
धनु रास (Sagittarius)
आजचा दिवस राशीच्या लोकांना नवीन यश मिळवून देईल. धनु राशीच्या लोकांना आज अचानक धनलाभ होईल, यामुळे तुम्ही दिवसभर आनंदी राहाल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वैवाहिक जीवनाचा आनंद घ्याल आणि कुटुंबातील सदस्यांना पूर्ण वेळ द्याल. परदेशातून व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगलं यश मिळेल. धार्मिक कार्यात तुम्ही सहभाग घ्याल. आज तुम्ही घरातील महत्त्वाची कामं पूर्ण कराल. तुमच्या वडिलांच्या मदतीने आज तुम्ही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. तुम्हाला व्यवसायात यश मिळेल आणि तुमच्यावर ग्राहकांचा विश्वास वाढेल. आज संध्याकाळी कुटुंबासोबत तुम्ही काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करू शकता.
उपाय : शत्रूंपासून आणि अडथळ्यांपासून मुक्त होण्यासाठी रविवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली चारमुखी दिवा लावा.
कुंभ रास (Aquarius)
आज कुंभ राशीच्या लोकांचा मान वाढेल. कुंभ राशीच्या लोकांना आज एकापेक्षा अधिक कामातून उत्पन्न मिळू शकतं, पैसे मिळू शकतात. आज मित्र आणि जवळच्या लोकांशी तुमची जवळीक वाढेल, तुम्ही आज मित्रांना भेटायला जाऊ शकता. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. व्यवसायात आज तुम्हाला यश मिळेल आणि तुम्हाला चांगला नफा कमवाल. नवीन वाहन खरेदी करण्याची तुमची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. कुटुंबात काही कलह सुरू असेल तर आज तुम्ही तो सोडवाल. घरातील आणि बाहेरील लोकांशी समन्वय राखण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या मुलाच्या नोकरीशी संबंधित काही चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते.
उपाय : तांब्याची दोन नाणी घ्या, यापैकी एक हातात घ्या आणि मनात कोणतीही इच्छा व्यक्त करून वाहत्या पाण्यात टाका आणि दुसरं नाणं खिशात ठेवा. तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :