एक्स्प्लोर

Astrology : आज लक्ष्मी नारायण योगासह बनले अनेक शुभ योग; 'या' 4 राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा, अनपेक्षित धनलाभाचे संकेत

Panchang 10 July 2024 : आज बुधवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, याचा 4 राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे. मिथुनसह 5 राशींवर आज लक्ष्मीची विशेष कृपा राहील, आजचा दिवस लाभाचा असेल. आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology 10 July 2024 : ग्रहांच्या स्थितीनुसार, आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज बुधवार, 10 जुलै रोजी चंद्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी असून या दिवशी रवियोग, लक्ष्मी नारायण योग आणि मघा नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. आज कोणत्या 3 राशींना नशिबाची सर्वाधिक साथ मिळणार? जाणून घेऊया आजच्या भाग्यवान राशी...

मिथुन रास (Gemini)

आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. आज, मिथुन राशीचे लोक धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घेतील. जर तुम्ही आधी गुंतवणूक केली असेल तर आज तुम्हाला अनुकूल परतावा मिळेल. तुमच्या आईसोबत तुमचे संबंध चांगले राहतील आणि ती आज तुम्हाला अनेक गोष्टींत मदत करेल, ज्यामुळे तुमचं मन खूप आनंदी होईल. आज व्यावसायिकांच्या व्यवसायात चांगली वाढ होईल. नोकरदार लोकांना आज बाप्पाच्या करिअरची व्याप्ती वाढवण्यात यश मिळेल आणि तुमच्या उत्पन्नातही वाढ होईल.

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी असणार आहे. कन्या राशीचे लोक आज आपली ध्येयं साध्य करू शकतील आणि तुमचा सोशल सर्कलही वाढेल. जर तुम्ही भविष्याचा विचार करुन आर्थिक नियोजन केलं असेल, तर आता तुम्हाला फायदे मिळू लागतील आणि आर्थिक लाभही मिळतील. नोकरदार लोकांना आज मोठं पद मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती होईल. भाऊ आणि प्रियजनांच्या मदतीने अनेक अपूर्ण कामं पूर्ण होतील. आज तुमचं आरोग्य चांगले राहील, ज्यामुळे तुम्ही आनंदी दिसाल.

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांचे अडकलेले पैसे आज परत मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येने त्रस्त असाल, तर आज तुम्हाला तुमच्या तब्येतीत सुधारणा दिसेल आणि तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होईल. सासरच्या मंडळींशी काही वाद चालू असेल तर तो आज संपेल. नोकरदार लोकांना आज करिअरच्या नवीन संधी मिळतील. व्यापाऱ्यांना आपला व्यवसाय वाढवता येईल आणि चांगला नफा मिळाल्याने त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल.

धनु रास (Sagittarius)

आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. धनु राशीच्या लोकांना आत्तापर्यंत ज्या समस्या होत्या त्या आज बाप्पाच्या कृपेने दूर होतील. आज कुटुंबातील एखाद्या सदस्याला सरकारी नोकरी मिळू शकते किंवा एखाद्या सरकारी योजनेचा लाभ मिळू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे त्यांची आज इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना आज त्यांच्या अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल आणि पदोन्नतीच्या चांगल्या संधी मिळतील. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस शुभ राहील आणि आर्थिक स्थितीही मजबूत राहील.  आज अचानक तुम्हाला एखादा जुना मित्र भेटेल आणि जुन्या आठवणी ताज्या होतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 10 July 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ramdas Athawale On Narayan Rane : नारायण राणेंनीही कधी अशी वक्तव्ये केली नाहीत : रामदास आठवलेShambhuraj Desai PC : मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची संबंधित विभागाकडे शिफारसSanjay Raut Vs Shrikant Shinde : आपटे आणि कोतवालांचे श्रीकांत शिंदेंशी संबंध, संजय राऊतांचा दावाMumbai Superfast : मुंबई सुपरफास्ट : 20 सप्टेंबर 2024 :6 pm : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Karnataka HC Judge Controversy : कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
Ashwini Jagtap: आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Pawar : राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
Sangli Crime : सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
Embed widget