Astrology : मे महिन्याची सुरुवातच लय भारी; पहिल्याच दिवशी बनला शुभ योग, 'या' 5 राशींची होणार भरभराट, पैसा हातात खेळणार
Panchang 1 May 2024 : मे महिन्याचा पहिलाच दिवस हा शुभ योगाने संपन्न झाला आहे. तसेच आज गुरू ग्रहाचंही मोठं मार्गक्रमण झालं आहे, याचा लाभ मुख्यत्वे 5 राशींना होणार आहे. या 5 राशींना आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology Today 1 May 2024 : ग्रहांची स्थिती पाहता, आज 1 मेचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज गुरू ग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे. गुरुच्या या हालचालीचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होणार आहे. याशिवाय आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी असून या दिवशी शुभ योग, शुक्ल योग आणि श्रवण नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व वाढलं आहे.
आज चंद्र मकर राशीत प्रवेश करेल. तर सूर्यापासून बाराव्या घरात बुध आणि मंगळाच्या स्थितीमुळे आज वेशी राजयोग तयार होत आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा फायदा होणार आहे. आज बाप्पाच्या कृपेने जीवनातील समस्या देखील दूर होतील. ग्रहांच्या स्थितीमुळे नेमक्या कोणत्या 5 राशींना (Zodiac Signs) आज फायदा होणार? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
आजचा दिवस हा मेष राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे. मेष राशीच्या लोकांना आज त्यांच्या मेहनतीचं योग्य फळ मिळेल. तुम्ही एखाद्या सरकारी सेवेत रुजू होऊ शकता. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचं योग्य फळ मिळेल. नोकरदार लोकांना आज त्यांच्या इच्छेनुसार काम करायला आवडेल आणि करिअरच्या प्रगतीसाठी सुवर्ण संधी मिळतील. आज तुम्हाला व्यवसाय क्षेत्रात चांगला नफा मिळेल. घरात आनंदाचं वातावरण राहील आणि सर्व सदस्यांमध्ये परस्पर प्रेम राहील. लव्ह लाईफमध्ये असणारे लोक त्यांच्या प्रियकराला भेटतील आणि त्यांच्यासोबत डिनरसाठी बाहेर जाऊ शकतील. आज तुमचं आरोग्य सुदृढ राहील.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना आज कामात मोठं यश मिळेल आणि ते चांगली कमाई करू शकतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि तुमचा नावलौकिक वाढेल. तसेच, करिअरच्या प्रगतीसाठी तुम्ही केलेल्या प्रयत्नांचे चांगले परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. व्यावसायिक आज नफ्यात असतील. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल आणि जोडीदारासोबत आनंदी क्षणांचा अनुभव घ्याल. आज कोर्टाच्या प्रकरणांतून तुम्हाला दिलासा मिळू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे, त्यांची इच्छा आज पूर्ण होऊ शकते.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. कन्या राशीचे लोक आज सर्व जबाबदाऱ्या उत्साहाने पार पाडतील. नोकरदार लोकांना आज त्यांच्या आवडत्या एखाद्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना चांगली बातमी ऐकायला मिळेल, तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल आणि कुटुंबालाही वेळ द्याल.व्यवसायाशी संबंधित लोकांना आर्थिक लाभ मिळेल.
धनु रास (Sagittarius)
आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी विशेष फलदायी असणार आहे. धनु राशीचे लोक आज वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात खूप प्रगती करतील. आज तुम्हाला तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. नवीन वाहन आणि मालमत्ता खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. प्रेमात पडलेल्यांसाठी आजचा दिवस रोमान्सने भरलेला असेल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक डिनर डेटवर जाऊ शकता, जिथे तुम्ही एकमेकांसोबत निवांत क्षणांचा आनंद घ्याल. व्यवसायात पैसे कमवण्याचे अनेक मार्ग मिळतील, आज तुम्हाला नवीन प्रकल्पाची जबाबदारी मिळेल. तुम्हाला तुमच्या पालकांची सेवा करण्याची संधी मिळेल. अविवाहित लोक आज एखाद्या खास व्यक्तीला भेटू शकतात.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. मीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात आज खूप आनंद येईल, तुम्ही तुमचं आयुष्य खूप उज्ज्वल करू शकता. आज तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. नोकरदार लोकांना आज त्यांच्या कामात मोठं यश मिळेल आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने पगार वाढवण्याची संधीही मिळेल. कोर्टात कोणतंही प्रकरण चालू असेल तर आज तुम्हाला तुमच्या हक्कासाठी लढण्याची आणि न्याय मिळवून देण्याची संधी मिळू शकते. तुम्ही घर किंवा दुकानाबाबत खूप चांगला निर्णय घेऊ शकता. कौटुंबिक वातावरण सुखाचं असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
