एक्स्प्लोर

Astrology : एप्रिलच्या पहिल्या दिवशी बनले अनेक शुभ योग; मेषसह 'या' 5 राशींचं नशीब पालटणार, अनपेक्षित धनलाभाचे संकेत

Panchang 1 April 2024 : आज, म्हणजेच एप्रिलच्या पहिल्या दिवशी रवि योग, वरियान योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत, ज्यामुळे आजचा दिवस मेष राशीसह 5 राशींसाठी फलदायी ठरणार आहे. सोमवार हा चंद्र देव आणि भोलेनाथांना समर्पित आहे, त्यामुळे आज या 5 राशींवर महादेवाची देखील कृपा राहील.

Astrology Today 1 April 2024 : आजचा दिवस ग्रहांच्या स्थितीमुळे फार महत्त्वाचा मानला जातो. आज, सोमवार, 1 एप्रिल रोजी चंद्र धनु राशीत प्रवेश करेल. तसेच आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी देखील आहे. या दिवशी वरियान योग, रवि योग आणि मूल नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा फायदा होणार आहे. या भाग्यवान 5 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया.

मेष (Aries Horoscope Today)

आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. आज मेष राशीचे लोक त्यांच्या डोक्याने पैशाशी संबंधित काही निर्णय घेतील, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. काही नवीन कामाची आवड तुमच्यात निर्माण होईल. नोकरी करणाऱ्यांनी आज अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल, त्यामुळे तुमचे काम वेळेवर पूर्ण होईल आणि तुम्हाला बढतीशी संबंधित बातमीही मिळेल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याची संधी मिळेल. आज व्यावसायिकांना नवीन डील मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे संपत्तीमध्ये चांगली वाढ होईल. आज तुम्ही कुटुंबातील सदस्यांसाठी काही खरेदीही कराल. तुमची काही जुनी प्रलंबित कामं आज पूर्ण होण्याची शक्यता आहे.

कर्क (Cancer Horoscope Today) 

एप्रिलचा पहिला दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी अनेक चांगल्या बातम्या घेऊन येईल. कर्क राशीचे लोक आज आर्थिकदृष्ट्या प्रगती करतील. नोकरदार लोकांचे मॅनेजर आज तुमच्या कामात तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. जर तुम्ही आज काही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ राहील, प्रगतीच्या चांगल्या संधी मिळतील. जर कोर्टात तुमच्या मालमत्तेशी संबंधित वाद चालू असेल तर निर्णय तुमच्या बाजूने लागेल. व्यापारी आज संपूर्ण दिवस व्यावसायिक कामात व्यस्त राहतील, आज तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुमचं कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगलं राहील.

सिंह (Leo Horoscope Today) 

आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. सिंह राशीच्या लोकांना महादेवाच्या कृपेने आज चांगला आर्थिक लाभ होईल आणि पैसे कमावण्याचे नवीन मार्गही तयार होतील. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही मालमत्तेत गुंतवणूक करू शकता. तुम्ही केलेल्या सामाजिक कार्यामुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळेल आणि कुटुंबात तुमची प्रतिष्ठा वाढेल. नोकरदार आणि व्यावसायिक आज त्यांच्या कामात यश अनुभवतील आणि आपापल्या क्षेत्रात नाव कमावतील. आज तुम्ही तुमच्या भाऊबहिणांसोबत घराच्या नूतनीकरणाबाबत चर्चा करू शकतात आणि काही धार्मिक कार्यक्रमातही सहभागी होऊ शकता.

तूळ (Libra Horoscope Today)

आज एप्रिलचा पहिला दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. तूळ राशीच्या लोकांना आज नवीन उत्पन्नाच्या स्त्रोतांतून पैसे मिळतील. तुम्ही कामाच्या ठिकाणी काही नवीन योजना आखू शकता, ज्या तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. आज तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात चांगलं यश मिळेल. नोकरदार लोकांना आज दुसऱ्या कंपनीकडून चांगल्या पगाराची ऑफर मिळू शकते, ज्यामुळे ते खूप आनंदी दिसतील. परदेशातून आयात-निर्यात व्यवसाय करणाऱ्यांना मोठी डील फायनल करण्याची संधी मिळेल. कुटुंबातील सर्व सदस्य तुमची आज्ञा पाळतील. तूळ राशीच्या लोकांना आज काही सरकारी योजनेचा लाभ मिळेल.

मकर (Capricorn Horoscope Today)

आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी शुभ आहे. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील आणि बँक बॅलन्समध्ये चांगली वाढ होईल. तुमचे पैसे एखाद्या योजनेत गुंतवणं तुमच्यासाठी चांगलं राहील. जर तुम्ही आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येने त्रस्त असाल तर आज तुम्हाला आराम मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कल्पनांनी तुमच्या वरिष्ठांना खूश कराल. आज तुमची काही थोर लोकांशी भेट होईल, जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्ही तुमच्या मनातील कोणतीही इच्छा तुमच्या कुटुंबियांकडे व्यक्त करू शकता.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope Today 1 April 2024 : आजचा सोमवार खास! भोलेनाथांची 'या' राशींवर राहणार विशेष कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
Success Story: सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरंपचांचे कान टोचले
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरंपचांचे कान टोचले
Bank Jobs : अहमदनगर जिल्हा बँकेत क्लार्क, चालक अन् सुरक्षारक्षक पदांची भरती,  696 जागांसाठी प्रक्रिया सुरु
सुवर्णसंधी, अहमदनगर जिल्हा बँकेनं भरतीसाठी अर्ज मागवले, क्लार्क, वाहनचालक अन् सुरक्षारक्षक पदं भरणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Vision Worli : वरळी माझ्या परिचयाचा भाग, बाळासाहेबांसोबत अनेदा आलोयRaj Thackeray Vision Worli : तुम्ही मुंबईचे मालक, रडता कशाला? राज ठाकरेंची कोळी बांधवांना सादTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha : 21 Sept 2024 : 6 PmAnandache Pan : आशाताईंच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडणारं पुस्तक 'स्वरस्वामिनी आशा' : 21 Sep 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
Success Story: सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरंपचांचे कान टोचले
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरंपचांचे कान टोचले
Bank Jobs : अहमदनगर जिल्हा बँकेत क्लार्क, चालक अन् सुरक्षारक्षक पदांची भरती,  696 जागांसाठी प्रक्रिया सुरु
सुवर्णसंधी, अहमदनगर जिल्हा बँकेनं भरतीसाठी अर्ज मागवले, क्लार्क, वाहनचालक अन् सुरक्षारक्षक पदं भरणार
Rishabh Pant : रिषभ पंतनं केली महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी, केवळ 34 कसोटीमध्ये गाठला मोठा टप्पा
रिषभ पंतकडून महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी, केवळ 34 कसोटी सामन्यांमध्ये गाठला टप्पा
Atishi CM मै आतिशी... दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा महिला; शपथविधीनंतर केजरीवालांचे चरणस्पर्श
Video : मै आतिशी... दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा महिला; शपथविधीनंतर केजरीवालांचे चरणस्पर्श
Tirupati Laddu Controversy : पडद्यावरचे नायक सोशल मीडियात भिडले! पवण कल्याण यांच्या 'त्या' मागणीवर जयकांत शिक्रेंचा 'सिंघम' स्टाईलने खोचक टोला
पडद्यावरचे नायक सोशल मीडियात भिडले! पवण कल्याण यांच्या 'त्या' मागणीवर जयकांत शिक्रेंचा 'सिंघम' स्टाईलने खोचक टोला
काय सांगता, 2 लाखांत IPS ची वर्दी अन् बंदूकही; बोगस अधिकाऱ्याचा असा झाला पर्दाफाश
काय सांगता, 2 लाखांत IPS ची वर्दी अन् बंदूकही; बोगस अधिकाऱ्याचा असा झाला पर्दाफाश
Embed widget