एक्स्प्लोर

Astrology : आज आयुष्मान योगासह बनले अनेक शुभ योग; वृषभसह 4 राशींना डबल लाभ, पाडव्याचा दिवस ठरणार खास

Panchang 02 November 2024 : आज शनिवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी आयुष्मान योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 4 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology Panchang 02 November 2024 : आज शनिवार, 2 नोव्हेंबरला चंद्र तूळ राशीनंतर वृश्चिक राशीत जाणार आहे. याशिवाय आज आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी असून या दिवशी बालिप्रतिपदा साजरी केली जाते आणि पाडवा साजरा केला जातो. आज त्रिपुष्कर योग, आयुष्मान योग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 4 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी असणार आहे. तुमची सर्व कामं हळूहळू पूर्ण होतील. तुमचा सामाजिक प्रभाव वाढेल, तुम्हाला यातून अनेक फायदे मिळतील आणि अनेक खास लोकांच्या भेटीही होतील. आज व्यवसाय नेहमीप्रमाणे सुरू राहील आणि नोकरदार लोक त्यांच्या कामात सर्जनशीलतेने वागतील, ज्याचं अधिकाऱ्यांकडून खूप कौतुक होईल. घरात धार्मिक वातावरण राहील. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी एखादी चांगली भेटवस्तू खरेदी करू शकता. जर तुम्हाला कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या आरोग्याची काळजी वाटत असेल तर आज त्यांची प्रकृती सुधारेल आणि तुमची चिंता कमी होईल.

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. सिंह राशीच्या लोकांच्या आजूबाजूचं वातावरण आज सकारात्मक असेल. आज अचानक धनलाभ होऊ शकतो. तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना आनंदी ठेवाल आणि कुटुंबातील सदस्यांसाठी काही खरेदीही कराल. दुकान आणि व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा कमावण्याची संधी मिळेल आणि तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसेल. पैशामुळे रखडलेली तुमची कामे आज पूर्ण होताना दिसतील. तुम्ही लहान मुलांसोबत मजा करताना दिसाल. सणानिमित्त घरात आनंदाचे वातावरण राहील.

तूळ रास (Libra)

आजचा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. आज तुमच्या सभोवतालचे वातावरण देखील आनंददायी राहील. आज तुम्हाला धन आणि मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होतील, ज्यामुळे तुमची देवावरील श्रद्धा वाढेल. जमीन आणि वाहन खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल आणि कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. जर तुम्ही स्वतः किंवा भागीदारीत व्यवसाय करत असाल तर आज तुम्हाला चांगला नफा मिळेल आणि तुमचा बँक बॅलन्स वाढेल. आज घरातील सर्व सदस्य खूप आनंदी दिसतील. मुलांची प्रगती पाहून मन प्रसन्न राहील.

मकर रास (Capricorn)

आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. मकर राशीचे लोक इतरांना मदत करण्यासही तयार राहतील. जर तुमच्यावर कर्ज असेल तर आज अचानक पैसे मिळाल्याने तुम्ही कर्ज फेडण्यास सक्षम असाल. कौटुंबिक सदस्याच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी, तुम्ही एखाद्या ज्येष्ठ सदस्याशी चर्चा कराल, ज्यामुळे तुम्हाला आवश्यक माहिती मिळेल. कौटुंबिक व्यवसायात तुम्हाला तुमच्या भावांच्या पाठिंब्याची आवश्यकता असेल, ज्यामुळे चांगला नफा मिळेल आणि नातेसंबंध मजबूत होतील. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर आज चांगला नफा मिळू शकेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 02 November 2024 : आज दिवाळी पाडव्याचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : मतदारांना घेऊन गाडी पोहोचली थेट मतदान केंद्रावर अन्...; भंडाऱ्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले
मतदारांना घेऊन गाडी पोहोचली थेट मतदान केंद्रावर अन्...; भंडाऱ्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली
नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं
नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitesh Karale Master Beaten : वर्ध्यात मतदान केंद्रावर राडा..कराळे मास्तरांना बेदम मारहाण!ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 20 November 2024Hitendra Thakur : तावडेंची अवस्था भिजलेल्या कोंबडी सारखी होती, ठाकूर पुन्हा बरसले ABP MAJHADahisar Voting Controversy : केंद्रावर जाण्याआधीच झालं होतं मतदान,स्थानिकांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : मतदारांना घेऊन गाडी पोहोचली थेट मतदान केंद्रावर अन्...; भंडाऱ्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले
मतदारांना घेऊन गाडी पोहोचली थेट मतदान केंद्रावर अन्...; भंडाऱ्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली
नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं
नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
Maharashtra Assembly Election 2024 : भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता अन् गीता जैन समर्थकांमध्ये बाचाबाची, पोलिसांची वेळीच मध्यस्थी अन्यथा...
भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता अन् गीता जैन समर्थकांमध्ये बाचाबाची, पोलिसांची वेळीच मध्यस्थी अन्यथा...
मतदान यंत्रावर मनोज जरांगे पाटील यांचा फोटो ठेवून तुतारीला मतदान, सोलापूर जिल्ह्यातील व्हिडीओ व्हायरल
मतदान यंत्रावर मनोज जरांगे पाटील यांचा फोटो ठेवून तुतारीला मतदान, सोलापूर जिल्ह्यातील व्हिडीओ व्हायरल
Chhagan Bhujbal : मी उमेदवार आहे, मी कुठंही जाऊ शकतो! छगन भुजबळांना विरोधकांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
मी उमेदवार आहे, मी कुठंही जाऊ शकतो! छगन भुजबळांना विरोधकांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
Embed widget