Astrology : तब्बल 50 वर्षांनंतर जुळून आला मालव्य आणि शुक्रादित्य राजयोग; आठवड्याच्या शेवटी 'या' 3 राशींचं नशीब 360 डिग्री पालटणार
Astrology : ग्रहांच्या या संक्रमणामुळे अनेक शुभ राजयोग निर्माण होतात. याचा प्रभाव सर्व राशींवर होतो.

Astrology : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सर्व ग्रह ठराविक अंतराने राशी परिवर्तन करतात. ग्रहांच्या या संक्रमणामुळे अनेक शुभ राजयोग निर्माण होतात. याचा प्रभाव सर्व राशींवर होतो. एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा असाच शुभ असणार आहे. कारण या आठवड्याच शुक्र ग्रह आपल्या उच्च राशीत म्हणजेच मीन राशीत विराजमान आहे. यामुळे मालव्य राजयोग जुळून आला आहे.
तसेच, सूर्यासह युती असल्यामुळे शुक्रादित्य राजयोग देखील जुळून आला आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा हे दोन शुभ ग्रह एकत्र येतात त्यामुळे सुख-समृद्धीत चांगली वाढ होते. या राजयोगामुळे करिअरमध्ये चांगली प्रगती होते. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मीन रास (Pisces Horoscope)
ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्रादित्य राजयोग आणि मालव्य राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे. या काळात तुमचे तुमच्या पार्टनरबरोबर चांगले व्यवहार असतील. तसेच, समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. उत्पन्नाचे अनेक नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
कुंडलीत दोन शुभ राजयोग निर्माण झाल्यामुळे हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेले तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील. जर तुम्ही नोकरी बदलीचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी फार चांगला असणार आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मालव्य राजयोग आणि शुक्रादित्य राजयोगामुळे मिथुन राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. या काळात तुमच्या पगारात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमच्यावर काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देखील सोपवण्यात येतील. तुमचा बॉस तुमच्या कामावर प्रसन्न असेल. तसेच, तुम्ही नवीन व्यवसायाची सुद्धा सुरुवात करु शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















