Hanuman Jayanti 2025 : हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी जुळून येणार 'पंचग्रही योग'; 12 एप्रिलपासून 'या' 5 राशींना सर्व संकटांपासून मिळणार मुक्ती
Hanuman Jayanti 2025 : हनुमान जयंतीच्या दिवशी मीन राशीत पंचग्रही योग जुळून येणार आहे. मीन राशीत बुध, शुक्र, शनी, राहू आणि सूर्य ग्रह एकत्र येणार आहेत.

Hanuman Jayanti 2025 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, यंदा 12 एप्रिल 2025 रोजी म्हणजेच शनिवारी हनुमान जयंती (Hanuman Jayanti) साजरी केली जाणार आहे. या दिवशी मीन राशीत पंचग्रही योग जुळून येणार आहे. मीन राशीत बुध, शुक्र, शनी, राहू आणि सूर्य ग्रह एकत्र येणार आहेत. त्यामुळे बुधादित्य योग, शुक्रादित्य योग, लक्ष्मी नारायण योग आणि मालव्य राजयोगसारखे अनेक राजयोग जुळून आले आहेत. हे सर्व राजयोग 4 राशींना लाभ देणार आहेत. त्यामुळे या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांवर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी बजरंगबलीची विशेष कृपा असणार आहे. या काळात तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. नवीन नोकरी मिळण्याची संधी आहे. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ फार शुभ असणार आहे. तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. धनलाभाची शक्यता आहे. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला चांगला लाभ मिळेल. घरात आनंदी वातावरण निर्माण होईल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
बजरंगबलीच्या कृपेने वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरीत चांगली प्रगती दिसून येईल. तुमच्या पगारात चांगली वाढ झालेली असेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार अधिक वाढलेला असेल. आर्थिक लाभ मिळेल. घरात सुख-शांती समाधान लाभेल. मित्रांच्या सहकार्याने तुम्ही अनेक कामे सहज पूर्ण करु शकता. तसेच, तुम्हाला परदेशात काम करण्याची संधी देखील मिळू शकते.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांना हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी चांगला आणि शुभ लाभ मिळणार आहे. तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती झालेली दिसेल. या दरम्यान तुम्हाला एखादी चांगली शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















