Astrology : पुढच्या 11 दिवसांत 'या' 4 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार; सर्व इच्छा होणार पूर्ण, अनपेक्षित धनलाभाचे संकेत
Astrology : ऑगस्ट महिन्याचा काळ 5 राशींसाठी खूप भाग्याचा ठरणार आहे. या 5 राशींना अनेक सुखसोयी मिळतील आणि त्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या
Astrology : ऑगस्ट महिन्यात ग्रहांच्या मोठ्या हालचाली होणार आहेत, 5 राशींसाठी हा काळ भाग्याचा ठरणार आहे. 31 ऑगस्टपर्यंत काही राशींचं भाग्य उजळेल, असाध्य गोष्टीही साध्य होतील. या 5 भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
मेष राशीचे लोक त्यांचा जास्तीत जास्त वेळ शुभ कार्यात आणि मौजमजा करण्यात घालवतील. या काळात लहान प्रवासाचीही शक्यता आहे. हा प्रवास तुमच्या कामाशी संबंधित असू शकतो किंवा कुटुंबासोबतही असू शकतो. या महिन्यात व्यावसायिकांना त्यांच्या मनाप्रमाणे नफा मिळेल. पूर्वी केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. घराच्या दुरुस्तीवर किंवा चैनीच्या वस्तूंच्या खरेदीवर पैसे खर्च होण्याची शक्यता आहे.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांचा ऑगस्ट महिन्याचा काळ चांगला असेल. तुमची सर्व प्रलंबित कामं या कालावधीत पूर्ण होऊ शकतात. तुमच्या प्रियकरासोबत सुरू असलेले सर्व गैरसमज दूर होतील. नवीन मालमत्ता खरेदी-विक्रीची योजना आखली जाईल. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने नवीन संधी मिळतील. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ मिळेल. आर्थिक बाबतीत नियोजनपूर्वक काम केल्यास निश्चित लाभ मिळेल. मात्र महिन्याच्या शेवटी वडिलोपार्जित मालमत्तेबाबत कुटुंबियांशी वाद होऊ शकतो.
कर्क रास (Cancer)
या आठवड्याच्या सुरुवातीला कर्क राशीचे लोक दीर्घकाळ अपूर्ण राहिलेल्या सर्व योजना नीट तयार करतील. नोकरीच्या ठिकाणी सर्वांचं पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबात काही शुभ कार्य होण्याचीही शक्यता आहे. नातेवाईक तुमचं प्रेम प्रकरण स्वीकारतील. जे कोणाच्या तरी प्रेमात आहेत, त्यांच्या नात्याला या महिन्यात मान्यता मिळू शकते. तथापि, या महिन्यात कोणालाही पैसे उधार देऊ नका. अन्यथा तुमचे पैसे कुठेतरी अडकू शकतात.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ संपत्तीच्या बाबतीत अनुकूल असणार आहे. तुमच्या मालमत्तेशी संबंधित काही वाद असल्यास ते सोडवले जातील. तुमच्या एखाद्या मैत्रिणीची मदत तुम्हाला मिळेल. महिन्याच्या शेवटी अनावश्यक खर्चामुळे तुम्ही थोडे उदास दिसाल. करिअरशी संबंधित कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. जे लोक प्रेमसंबंधात आहेत त्यांनी आपल्या जोडीदाराच्या भावनांचा आदर केला पाहिजे.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप चांगला जाणार आहे. कामाच्या ठिकाणी सकारात्मक परिणाम दिसून येतील. नोकरदारांना वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरदार महिलांसाठी हा काळ शुभ आहे. या राशीचे लोक जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. महिन्याच्या मध्यात भावंडांकडून थोडं कमी सहकार्य मिळेल. महिन्याच्या शेवटी तुमच्या समस्या संपतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani News : शनीने नक्षत्र बदललं; 5 राशी जगणार राजासारखं जीवन, होणार अपार धनलाभ