![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Astrology : आज आयुष्यमान योग आणि सौभाग्य योगाचा शुभ संयोग; कुंभसह 'या' 5 राशींना होणार धनलाभ
Pradosh Vrat : आज आयुष्मान योग, सौभाग्य योग यांसह अनेक शुभ फलदायी योग तयार होत आहेत, त्यामुळे बुध प्रदोष व्रताचा दिवस वृषभ, कर्कसह 5 राशींसाठी लाभदायक ठरणार आहे.
![Astrology : आज आयुष्यमान योग आणि सौभाग्य योगाचा शुभ संयोग; कुंभसह 'या' 5 राशींना होणार धनलाभ astrology aayushman yog and saubhagya yog on 21 february 2024 is very lucky for karka sinha vrushchik vrushabh kumbha rashi lucky zodiac signs in marathi Astrology : आज आयुष्यमान योग आणि सौभाग्य योगाचा शुभ संयोग; कुंभसह 'या' 5 राशींना होणार धनलाभ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/21/20ee3abc7d1c29e9f4a0078a747161b51708491307427713_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Astrology : आज, 21 फेब्रुवारीला माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असून ही तिथी बुध प्रदोष व्रत म्हणून ओळखली जाते. आज प्रदोष व्रतात आयुष्मान योग, सौभाग्य योग आणि पुनर्वसु नक्षत्र यांचा शुभ संयोग घडून आला आहे, त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध प्रदोष तिथीला शुभ योग तयार होत असल्याने 5 राशींना याचा अधिक लाभ मिळणार आहे. या राशीच्या लोकांसाठी प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील आणि त्यांच्या मनोकामनाही पूर्ण होतील. आजच्या 5 भाग्यवान राशींबद्दल जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी प्रगतीचा दिवस असणार आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी आज प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील आणि तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. आज तुम्हाला कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये दिलासा मिळेल आणि समस्या संपतील. कौटुंबिक व्यवसाय करणारे आज पूर्ण उर्जेने आणि उत्कृष्ट कल्पनांनी काम करतील. आज तुम्ही प्रत्येक परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळण्यास सक्षम असाल. ऑनलाईन काम करणाऱ्या लोकांवर कामाचा ताण जास्त असेल, पण या कामांमधून तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळतील, ज्याचा तुम्हाला भविष्यातही उपयोग होईल. भावंडांसोबत काही मतभेद असतील तर ते आज मिटतील.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक परिणाम देणारा असेल. आज बाप्पाच्या कृपेने कर्क राशीच्या लोकांची सर्व कामं कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील आणि तुम्ही कठीण प्रसंगांनाही नीट तोंड द्याल, त्यामुळे तुम्हाला विजय मिळेल. जर तुम्हाला तुमच्या आईच्या किंवा इतर कुटुंबातील सदस्यांच्या तब्येतीची काळजी वाटत असेल, तर त्यांना डॉक्टरकडे घेऊन जा. आज तुम्हाला एखाद्या प्रिय व्यक्तीसोबत बाहेर जाण्याची संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना आज प्रगतीच्या चांगल्या संधी मिळतील आणि अधिकारी आणि सहकाऱ्यांशी संबंधही चांगले राहतील. तुम्हाला तुमच्या मुलाच्या करिअरशी संबंधित काही चांगली माहिती मिळू शकते.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा, म्हणजेच 21 फेब्रुवारीचा दिवस खूप फलदायी असणार आहे. सिंह राशीच्या लोकांना आज चांगला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे आणि काही नवीन गुंतवणुकीत पैसे गुंतवणंं तुमच्यासाठी चांगलं राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या चांगल्या विचारसरणीमुळे तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुमच्या मनात स्पर्धेची भावना राहणार नाही. तुमच्या जोडीदारासोबत अनेक गैरसमज चालू असतील तर ते आज संपतील.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आणि फलदायी असणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना आज काही जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो आणि ते कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवतील. आज काही वडिलोपार्जित संपत्ती मिळाल्याने तुमच्या एकूण संपत्तीत वाढ होईल. आज व्यावसायिकांना व्यावसायिक करारांमध्ये यश मिळेल आणि ते त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देऊ शकतील. व्यवसायात निर्माण होणाऱ्या समस्या मित्रांच्या मदतीने सुटतील. घरगुती कामात भाऊ-बहिणींचं पूर्ण सहकार्य मिळेल आणि घरामध्ये काही शुभ कार्यक्रमाचं आयोजनही करता येईल.
कुंभ रास (Aquarius)
आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक आहे. कुंभ राशीच्या लोकांना आज बाप्पाच्या कृपेने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि तुम्ही व्यवसाय विस्ताराचं नियोजन देखील करू शकाल. प्रॉपर्टी डीलिंगमध्ये काम करणाऱ्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराच्या करिअरबाबत तुम्हाला काही टेन्शन असेल तर तेही दूर होईल. तुमचं एखादं खूप दिवसांपासून प्रलंबित असलेलं काम पूर्ण होऊ शकतं. जर तुम्ही कोणत्याही योजनेत पैसे गुंतवले असतील तर आज तुम्हाला चांगला नफा मिळेल. नोकरदार लोक आज दुसऱ्या कंपनीत मुलाखतीसाठी जाऊ शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani 2024 : जूनमध्ये होणार शनीचं मोठं परिवर्तन; पालटणार 'या' 3 राशींचं नशीब, होणार धनलाभ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)