शरीरावरील तीळ ठरवते तुमचे नशीब; 'या' दहा जागी तीळ म्हणजे धनाचे महासंकेत, जीवनात फक्त होते भरभराट
Mole On Body : व्यक्ती कसा असेल आणि पैशांची आवक किंवा राजयोग याबाबतचा अंदाज तीळ पाहून लावता येतो.आज आपण शरीरावर असलेल्या तीळाचे महत्त्व जाणून घेणार आहे.
Mole On Body : शरीराच्या विशिष्ट भागावर तीळ (Moles) असण्याचा काही अर्थ असतो असे आपण आपल्या वाडवडिलांकडून ऐकत आलो आहे. काही लोक मानतात की तळहातावर तीळ असणे तुमची शक्तिशाली आर्थिक स्थिती दर्शवते. वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये त्याचा वेगळा अर्थ (meaning of moles) असू शकतो. समुद्र शास्त्रानुसार, शरीरावर तीळ असणे शुभ आणि अशुभ दोन्ही असते. तीळ व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा तसेच नशिबाबाबत सांगते. व्यक्ती कसा असेल आणि पैशांची आवक किंवा राजयोग याबाबतचा अंदाज तीळ पाहून लावता येतो.आज आपण शरीरावर असलेल्या तीळाचे महत्त्व जाणून घेणार आहे.
शरीरावर 'या' दहा जागी तीळ असणे राजयोगाचे महासंकेत
हनुवटीखाली तीळ - ज्या व्यक्तीच्या हनुवटीखाली तीळ असते अशा व्यक्ती अतिशय लकी असतात. या व्यक्तीची सर्व कामे अतिशय पटापट आणि यशस्वी होतात. या व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत असते. पुरुषांच्या हनुवटीखाली तीळ असेल तर अशी व्यक्ती पैसे कमवण्यासाठी नेहमी आतूर असतो. ज्या स्त्रियांच्या हनुवटीखाली तीळ असते अशा स्त्रियांना तयार व्हायला खूप आवडते. कमी कष्टात जास्त फायदा असतो
नाकावर तीळ - नाकावर तीळ असणे शुभ असते. त्या व्यक्ती स्वच्छ मनाचे स्वाभिमानी आणि स्वत:च्या कार्यवर विश्वास ठेवणाऱ्या असतात. स्वत:च्या मेहनतीवरच ते मोठे होतात. त्यांना जीवनात यश मिळते. वयाच्या 32 वर्षानंतर त्यांच्या आयुष्यात भरभराट होते. नाकावर तीळ असणाऱ्या व्यक्ती बोलबच्चन असतात. त्यांच्या बोलण्याच्या हुशारीने धन कमवतात
पाठीवर तीळ - पाठीवर तीळ असणाऱ्या व्यक्तींना फिरायला खूप आवडते. त्या शिवाय या व्यक्ती रोमँटिक असतात. कुटुंबाची अतिशय काळजी घेतात. कमी वयात मोठ्या पदावर पोहचतात
तळहातावर तीळ- पुरुषांच्या उजव्या तळहातावर आणि स्त्रियांच्या डाव्या तळहातवर तीळ असणे अतिशय शुभ असते. ज्यावेळी आपण हाताची मूठ करतो त्यावेळी तीळ मुठीत येत असेल तर ते व्यक्ती भाग्यदायी असतात
पायाच्या अंगठ्यावर तीळ- अशा व्यक्तींना समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळतात. या व्यक्ती अतिशय हसतमुख राहतात. फिरायला फार आवडते. या व्यक्ती पैसे फक्त मौजमजेसाठी पैसे खर्च करतात
बेंबीवर तीळ- बेंबीच्या वरच्या भागावर तीळ असेल तर ती व्यक्ती खाण्यापिण्याची शौकीन असते. जर बेंबीच्यामध्ये तीळ असेल तर व्यक्तीला भरपूर धनसंपत्ती प्राप्त होते.
करंगळीशेजारील बोटावर तीळ- करंगळीशेजारील बोटावर तीळ असते अशा व्यक्ती जीवनात धनवान आणि यशस्वी असतात. या व्यक्ती कलाकार असतात. बुद्धीच्या जोरावर धन प्राप्त करतात. दिलेला शब्द कधी मोडत नाही.
बेंबीच्याखाली तीळ - या व्यक्ती कानाच्या कच्च्या नसतात. यांना कोणतीही गोष्ट सांगितली तर या व्यक्ती गुप्त ठेवतात. या व्यक्ती अतिशय विश्वासू असतात
अंगठ्याशेजारील बोटावर तीळ- तर्जनीवर तीळ असणारे परीपूर्ण यश मिळते. ज्या व्यक्तींच्या तर्जणीवर तीळ असते अशा व्यक्तीचे शत्रू खूप असतात.
दोन भुवयांमध्ये तीळ - दोन भुवयांमध्ये तीळ असणाऱ्या व्यक्ती अतिशय भाग्यशाली असतात. विवाहापश्चात त्यांचा भाग्योदय उजळतो. वैवाहिक जीवन आनंददायी असते. यांचे भाग्य नेहमीच साथ देते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :
Chanakya Niti : वय फक्त आकडा नाही हो! सुखी संसारासाठी वय महत्त्वाचं, लग्न करताना एवढं अंतर तर हवंच;चाणक्याने सांगितलंय कारण