Ashadhi Ekadashi Captions : आषाढी एकादशीच्या फोटोंना द्या 'हे' सुंदर कॅप्शन्स; खुलवा तुमच्या फोटोंचं सौंदर्य, वाचा हटके कॅप्शन्सची लिस्ट
Ashadhi Ekadashi Quotes : आषाढी एकादशीच्या दिवशी प्रत्येक जण पारंपरिक वेशात फोटो काढत असतो. मात्र हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना त्याला कॅप्शन काय द्यावं? हा प्रश्न प्रत्येकाला पडतो, यासाठी काही हटके कॅप्शन्स आज पाहूया.
Ashadhi Ekadashi 2024 Captions : आषाढी एकादशी म्हटलं की आठवते पंढरी, विठुनामाचा जयघोष, पंढरपूरची वारी आणि भक्तिरसात तल्लीन झालेले वारकरी. आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi 2024) पंढरपूरासह राज्यभरातील मंदिरं भक्तांच्या गर्दीने फुलून जातात. शाळा, कॉलेजसह अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातूनही विठूनामाचा गजर केला जातो. अनेकजण आषाढीचा उपवास करतात, या दिवसापासून चातुर्मास देखील सुरू होतो.
संपूर्ण महाराष्ट्रात आषाढीचा उत्साह पाहायला मिळतो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण पारंपरिक कपड्यांमध्ये आणि बहुधा वारकऱ्यांच्या वेशात दिसतो. अनेक जण स्वत:चे आणि लहान मुलांचे फोटो WhatsApp, Facebook वर शेअर करत असतात. या फोटोंना कॅप्शन (Ashadhi Ekadashi Quotes) काय द्यावा? असा प्रश्न अनेकांना पडतो. तर आज आपण अशा सुंदर फोटोंसाठी काही अभंगपर गाण्यांचे कॅप्शन्स (Ashadhi Ekadashi Vitthal Songs) पाहूया.
आषाढी एकादशी शुभेच्छा संदेश/कॅप्शन्स (Ashadhi Ekadashi Captions)
टाळ वाजे, मृदंग वाजे, वाजे हरीची वीणा, माऊली निघाले पंढरपुरा...
मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा, आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!
अवघे गरजे पंढरपूर..
चालला हरि नामाचा गजर,
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
पाऊले चालती पंढरीची वाट,
सुखी संसाराची सोडुनिया गाठ!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
विठू माऊली तू माऊली जगाची,
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची,
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
या संतांचा, मेळा गोपाळांचा, झेंडा रोविला...
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
चंद्रभागेच्या तीरी,
उभा मंदिरी,
तो पहा विटेवरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी
एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराज की जय!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
सावळे सुंदर रूप मनोहर
राहो निरंतर हृदयी माझे!
आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!
जरी बाप साऱ्या जगाचा, परि तू
आम्हा लेकरांची विठू माऊली...
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल।
करावा विठ्ठल जीवभाव।।
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
हेची दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
पहाताच होती दंग आज सर्व संत
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल,
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
सोहळा जमला आषाढी वारीचा
सण आला पंढरीचा
मेळा जमला भक्तगणांचा
ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा!
हेही वाचा: