Aquarius Horoscope Today 29th March 2023 : विद्यार्थ्यांना परदेश गमनाचे योग, असा' असेल कुंभ राशीचा आजचा दिवस
Aquarius Horoscope Today 29th March 2023 : कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. आज तुमची एखादी इच्छा पूर्ण झाल्यास तुम्हाला आनंद होईल.
Aquarius Horoscope Today 29th March 2023 : कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज आपल्या उत्पन्नात झालेली वाढ पाहून नोकरदार वर्गाला खूप आनंद होईल. तुमच्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होईल. नोकरीत अडकलेले पैसे आज तुम्हाला परत मिळू शकतात. कुटुंबियांशी (Family Member) संवाद साधताना आपल्या बोलण्यात गोडवा ठेवा. घरात पाहुण्यांचे (Guest) येणे-जाणे सुरुच राहील. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. कार्यक्रमात कुटुंबासह सहभागी व्हा. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी (Student Education) एका शहरातून दुसऱ्या शहरातही जाण्याची संधी आहे. मित्रांबरोबर आपले सुख-दु:ख शेअर करा.
विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा
कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. आज तुमची एखादी इच्छा पूर्ण झाल्यास तुम्हाला आनंद होईल. पण तरीही, कार्यक्षेत्रात कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. अन्यथा तुमचा विश्वासघात होऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. कुटुंबात काही शुभ कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात. कुंभ राशीच्या नोकरदार आणि व्यावसायिकांना आज चांगले परिणाम मिळतील. आज या राशीचे नोकरदार लोक ऑफिसमधील अधिकाऱ्यांच्या मदतीने अनेक कामे पूर्ण करतील.
वैवाहिक नात्यात गोडवा राहील
आज तुमच्या वैवाहिक नात्यात गोडवा येईल आणि दोघेही एकमेकांची काळजी घ्याल. आज तुम्हाला भाऊ-बहिणींकडून आनंद आणि सहकार्य मिळेल. आज नातेवाईकांशी वाद घालू नका, अन्यथा संबंध बिघडण्याचा धोका आहे. आर्थिक बाबतीत तुमच्यासाठी आजचा दिवस थोडा कठीण जाईल. राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठेपेक्षा कामाकडे जास्त लक्ष द्या.
आज कुंभ राशीचे आरोग्य
कुंभ राशीच्या लोकांना इजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतंही काम करताना घाई करु नका. तसेच वाहन चालवताना काळजी घ्या.
कुंभ राशीसाठी आजचे उपाय
नोकरी-व्यवसायात प्रगतीसाठी पिंपळाच्या झाडाखाली लोखंडी भांड्यात पाणी, साखर, दूध, तूप मिसळून पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी ठेवा. 21 बुधवारपर्यंत हे व्रत करत राहा.
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, कुंभ राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :