Aquarius Horoscope Today 10 April 2023 : कुंभ राशीच्या लोकांची कामाच्या ठिकाणी प्रगती होईल, आनंदाची बातमी मिळेल; राशीभविष्य जाणून घ्या
Aquarius Horoscope Today 10 April 2023 : आज तुम्हाला कुटुंबातील सदस्याच्या आरोग्यासाठी पैसे खर्च करावे लागतील.
Aquarius Horoscope Today 10 April 2023 : कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस महत्वाचा असणार आहे. कुटुंबाचे (Family) सहकार्य मिळेल. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. घरोघरी पूजा, पठण, भजन, कीर्तन यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. ज्यामध्ये सर्व लोक ये-जा करतील. तुमच्या आरोग्यातील चढ-उतार तुम्हाला त्रास देतील. आज तुम्हाला कान आणि घशाचा त्रास होऊ शकतो. तुम्ही चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास तुम्हाला आराम वाटेल. तुमच्यावर कुटुंबाच्या अधिक जबाबदाऱ्या वाढू शकतात, तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्याप्रकारे पार पाडाल.
आर्थिक खर्चाकडे लक्ष द्या
कुंभ राशीच्या व्यावसायिक, नोकरदारांनी आज काळजीपूर्वक काम करणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी हळूहळू प्रगतीची परिस्थिती निर्माण होईल. आर्थिक खर्चाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. व्यवसायात एखाद्या व्यवहाराअंतर्गत किरकोळ नुकसान होऊ शकते. या राशीचे नोकरदार लोक आज नोकरीच्या शोधात असतील.
आज तुम्हाला कुटुंबातील सदस्याच्या आरोग्यासाठी पैसे खर्च करावे लागतील. तसेच तुम्हाला मुलांच्या शिक्षणावर आणि त्यांच्या करिअरवरही लक्ष केंद्रित करावे लागेल. कुटुंबासोबत आज संध्याकाळ आनंदाने घालवा. तुमच्या मनाला शांती मिळेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील.
धार्मिक स्थळांच्या प्रवास होण्याची शक्यता
कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर कुंभ राशीच्या लोकांचा दिवस सामान्य राहणार आहे. कुटुंबातील सदस्यांबरोबर तुमचा दिवस आनंददायी जाईल. सुदैवाने, दुपारपर्यंत मुलाकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. धार्मिक स्थळांचा प्रवास होण्याची शक्यता आहे. आज कुंभ राशीचे लोक कुटुंबातील सदस्याच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे चिंतेत राहू शकतात. त्यांच्या उपचारासाठी तुम्हाला काही पैसेही खर्च करावे लागतील.
कुंभ राशीचे आजचे आरोग्य
कुंभ राशीच्या लोकांना डोकेदुखी तसेच डोळे दुखण्याचा त्रास होऊ शकतो. यावर लगेच उपचार करा. जास्त मोबाईल किंवा टीव्ही पाहणे टाळा.
कुंभ राशीसाठी आजचे उपाय
व्यवसायात प्रगतीसाठी मंगळवारी संबंधित वस्तूंचे दान करा आणि गाईला हिरवा चारा खाऊ घाला.
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, कुंभ राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :