Angarki Chaturthi 2024 : अंगारकी चतुर्थी कशी सुरू झाली? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
Angarki Chaturthi 2024 : संकष्ट चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा तिला ‘अंगारकी’ चतुर्थी म्हणतात. सर्व चतुर्थींपैकी अंगारक संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे, ही चतुर्थी वर्षातून दोनदा येते. अंगारक चतुर्थीची सुरुवात नेमकी कशी झाली? जाणून घ्या.
Angarki Chaturthi 2024 : गणपती बाप्पा म्हणजे आपलं आराध्य दैवत! गणपती बाप्पाला प्रत्येक जण खूप मानतो, मंगळवारचा दिवस हा गणपती बाप्पाला समर्पित आहे. या दिवशी बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी उपवास ठेवतात आणि याच मंगळवारच्या दिवशी जेव्हा चतुर्थी तिथी येते, तेव्हा तिचं महत्त्व अधिक वाढतं. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचं व्रत सर्वश्रेष्ठ मानलं जातं. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकतं. या दिवशी व्रताचं पालन केल्याने बाप्पा लवकर शुभ फळ देतो. संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi 2024) जेव्हा मंगळवारी येते तेव्हा तिला ‘अंगारकी’ म्हणण्याची प्रथा आहे. या अंगारकी चतुर्थीची कहाणी जाणून घेऊया.
कशी झाली अंगारकीची सुरुवात?
गणेश पुराण या ग्रंथात दिलेल्या कथेनुसार, अंगारक या भारद्वाज ऋषी पुत्राने कठोर तप करुन गणपतीला प्रसन्न केलं. गणपतीने याने अंगारक याला वर दिला होता की, तुझं नाव हे 'अंगारक' म्हणून नेहमी लोकस्मरणात राहील. गणपती अंगारक ऋषींवर जेव्हा प्रसन्न झाले, तो दिवस चतुर्थीचा होता. या कथेनुसार, अंगारकी चतुर्थीचं (Angarki Chaturthi 2024) व्रत केल्यास कोणतंही संकट येत नाही आणि जरी संकट आलं तरी त्याचं निवारण होतं.
गणपतीला असं मिळालं 'मंगलमूर्ती' नाव
कथेत आलेला अंगारक म्हणजेच, आकाशात दिसणार मंगळ ग्रह, असं मानलं जातं. गणेशाने मंगळाला वर दिला की, तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचं कल्याण करणारी ठरेल. त्या दिवसापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झालं. नंतर मंगळाने गणपतीचं एक मंदिर बांधलं आणि तिथे गणपतीची मूर्ती स्थापन केली आणि याच मूर्तीला मंगलमूर्ती असं नाव मिळालं.
अंगारक संकष्ट चतुर्थी उपाय (Angarki Sankashti Chaturthi 2024 Upay)
- जर तुम्ही वर्षभर मेहनत करूनही तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ मिळत नसेल तर, तुम्ही श्री गणेशाची आराधना करू शकता. यासाठी तुम्ही 'श्री गणेशाय नम:' या मंत्राचा 11 वेळा जप करा.
- जर तुम्हाला तुमची संपत्ती आणि समृद्धी वाढवायची असेल तर, तुम्ही आजच्या दिवशी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी मोदक किंवा लाडूचा नैवेद्य अर्पण करू शकता. तुम्ही बुधवारी देखील हा उपाय करू शकता, यामुळे तुमच्या घरात संपत्ती टिकून राहील.
- भगवान गणेशाला दुर्वा फार आवडतो. जर तुम्हाला व्यवसायात प्रगती हवी असेल तर, तुम्ही 11 दुर्वा गाठी गणेशाला अर्पण करू शकता, यामुळे व्यवसायात तुमचं नुकसान होणार नाही.
- तुम्हाला तुमची सर्व कामं कोणत्याही अडचणीशिवाय, अडथळ्याशिवाय पूर्व व्हावीत, असं जर वाटत असेल तर तुम्ही आजच्या दिवशी गणपतीची पूजा करण्याबरोबरच गणेशाचा 11 वेळा जप करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: