Vegetable Prices: दुर्गापूजेच्या मुहूर्तावर भाजीपाला महागला, आले 300 रुपयांवर; तर बटाट्यासह भेंडीही महाग
दुर्गापूजेच्या मुहूर्तावरही भाजीपाला महागला आहे. कोलकातामध्ये आल्याचा दर 300 रुपये किलोवर गेला आहे.
Vegetable Rates: सध्या नवरात्रीचा उत्सव सुरु आहे. उद्या दसऱ्याचा सण आहे. दरम्यान दुर्गापूजेच्या मुहूर्तावरही भाजीपाला महागला आहे. कोलकातामध्ये आल्याचा दर 300 रुपये किलोवर गेला आहे. तर अन्य भाजीपालाही 70 ते 90 रुपये किलोवर पोहोचला आहे. तर बटाट्याचा दर 35 रुपये किलोवर पोहोचला आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भाज्या महाग झाल्यामुळं लोक त्रस्त झाले आहेत.
पश्चिम बंगाल सरकारच्या रविवारी जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या नोंदीनुसार, किरकोळ बाजारात बहुतांश भाज्यांचे दरात मोठी वाढ झाली आहे. कारले, बटाटे या भाज्या महाग झाल्या आहेत.
भेंडीच्या दरातही मोठी वाढ
पश्चिम बंगालमध्ये इतर भाज्यांबरोबर भेंडीच्या दरातही वाढ झाली आहे. प्रति किलोसाठी 90 रुपये मोजावे लागत आहेत. टास्क फोर्सच्या एका सदस्याने सांगितले की, सरासरी प्रत्येक भाजीपाल्याच्या किमती गेल्या आठवड्याच्या तुलनेत किमान 10 ते 15 रुपयाने जास्त आहेत. सध्या फक्त टोमॅटोच्या किंमतीत घसरण झाली आहे. ही घसरण 40 ते 50 रुपये किलोनं झाली आहे.
आले 300 रुपये किलो
पश्चिम बंगालच्या बाजारात आल्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. सध्या आले 280 ते 300 रुपये किलोवर गेले आहे. लसूण 130 ते 150 रुपये किलोवर गेले आहेत. मिरचीचा दर 150 ते 200 रुपये किलोवर आहत.
महत्त्वाच्या बातम्या: