Sugar sales : उन्हाळी हंगामात भारतातील साखर विक्री विक्रमी; उच्चांक गाठण्याचा इस्माचा अंदाज
Sugar sales : दोन वर्षांचा लॉकडाऊन आणि महामारीचे निर्बंध शिथिल केल्यानंतर भारतातील साखरेचा वापर चालू उन्हाळी हंगामात विक्रमी उच्चांक गाठणार आहे असा अंदाज इस्माने वर्तविला आहे.
Sugar sales : दोन वर्षांचा लॉकडाऊन आणि महामारीचे निर्बंध शिथिल केल्यानंतर भारतातील साखरेचा वापर चालू उन्हाळी हंगामात विक्रमी उच्चांक गाठणार आहे असा अंदाज इस्माने वर्तविला आहे. कारण निर्बंध शिथिलता आणि सुरु असलेला भयाण उन्हाळा यामुळे कोल्ड ड्रिंक आणि आइस्क्रीम उत्पादकांसारख्या मोठ्या प्रमाणात ग्राहकांची मागणी वाढली असल्याचं एका उद्योजकाने सांगितले आहे.
आर्थिक वर्षाप्रमाणेच चालू मार्केटिंग वर्ष २०२१/२२ मध्ये एका वर्षापूर्वीच्या तुलनेत जवळपास ३ टक्के उत्पादन वाढून ते २७.२ दशलक्ष टनापर्यंत पोहोचेल असा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (ISMA) वर्तविला आहे. २०२१/२२ या मार्केटिंग वर्षात 7.2 दशलक्ष टन साखर परदेशात पाठवण्यासाठी भारतीय गिरण्यांनी करारावर स्वाक्षरी केल्यामुळे, निर्यात देखील विक्रमी पातळीवर पोहोचण्याची अपेक्षा आहे. पण, या सगळ्याचा परिणाम स्थानिक भागात साखेरच्या किमती वाढण्याविण्यार होऊ शकतो आणि स्वीटनरच्या जगातील दुसऱ्या-सर्वात मोठ्या उत्पादकातील साठा कमी होऊ शकतो. देशांतर्गत, जास्त किमतींमुळे गिरण्या कमी साखर निर्यात करु शकतात, यामुळे जागतिक किमतींना आधार देण्यासाठी मग शिपमेंटवर सरकारी निर्बंध लादले जाऊ शकतात.
सरकारने लग्न आणि इतर कार्यक्रमांवरील निर्बंधही उठवले आहेत. परिणामी थंड पेये आणि आइस्क्रीमचा वापर वाढल्याने स्वाभाविकच साखरेची मागणी ही भारतात मार्च ते जून या काळात मोठ्या प्रमाणात असते. लग्नाच्या हंगामापासून उन्हाळ्यात मागणीलाही चालना मिळते, परंतु गेल्या दोन वर्षांत अधिकाऱ्यांनी कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी विवाहसोहळा आणि इतर कार्यक्रमांमध्ये पाहुण्यांची संख्या मर्यादित केली होती. वाढती निर्यात आणि वाढलेली स्थानिक स्तरावरची मागणी यामुळे स्थानिक किमतींमध्येही समतोल साधला जाईल असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविला आहे. देश नवीन मार्केटिंग वर्षाची सुरुवात सुमारे 6 दशलक्ष टनांच्या ओपनिंग स्टॉकसह करू शकतो, जो गेल्या पाच वर्षांतील सर्वात कमी स्टॉक राहील असंही एका जागतिक व्यापार फर्मसह मुंबईस्थित डीलरने सांगितले. देशांतर्गत किमतीत होणारी वाढ रोखण्यासाठी भारताने सहा वर्षांत प्रथमच साखरेच्या निर्यातीवर निर्बंध घालण्याची योजना आखली आहे आणि या हंगामातील निर्यात 8 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचू शकेल जी अजूनही विक्रमी पातळी आहे असं सरकारी आणि उद्योग सूत्रांनी गेल्या महिन्यात रॉयटर्सला सांगितले.
गेल्या दोन आठवड्यांपासून स्थानिक साखरेच्या किमती वाढल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात खरेदीदारांकडून मागणी वाढणार असल्याने ही किंमत आणखी वाढू शकते असाही अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.