Skymet Monsoon News : मान्सून कधी दाखल होणार? स्कायमेटनं सांगितली 'ही' तारीख
स्कायमेटने यंदा देशात मान्सून सरासरीच्या 98 टक्के राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. स्कायमेटने देशात मान्सून दाखल होण्याची तारीख सांगितली आहे.
Skymet Monsoon News : हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेट या खासगी संस्थेने यंदा देशात मान्सून सरासरीच्या 98 टक्के राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यंदा मान्सून सामान्य राहणार असल्याची माहिती या संस्थेनं दिली आहे. जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीसाठीचा अंदाज स्कायमेट या संस्थेन वर्तवला आहे. देशात सलग चौथ्या वर्षी सामान्य किंवा त्यापेक्षा जास्त मान्सून राहणार असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे. स्कायमेटने देशात मान्सून दाखल होण्याची तारीख सांगितली आहे. 26 मे 2022 रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचे स्कायमेटने सांगितले.
स्कायमेटने 2022 साठी मान्सून सुरु होण्याची तारीख जाहीर केली आहे. 26 मे 2022 रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचे स्कायमेटने सांगितले.1961 ते 2019 पर्यंतच्या आकडेवारीवर आधारित, भारतात मान्सून सुरू होण्याची सामान्य तारीख 1 जून असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे. केरळमध्ये नैऋत्य मान्सूनची सुरुवात मुख्यत्वे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरील समुद्राच्या परिस्थितीवर अवलंबून असते. नुकत्याच आलेल्या आसनी चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरातील मान्सूनचा प्रवाह सामान्यपेक्षा लवकर बंद झाला आहे. असनीच्या परिणामामुळे अरबी समुद्राच्या मध्यवर्ती भागावरील प्रतिचक्रीवादळ नष्ट झाले आहे. जी मान्सूनच्या प्रगतीसाठी आवश्यक स्थिती आहे. हे MJO (मॅडन ज्युलियन ऑसिलेशन) हिंद महासागरात प्रवेश केल्याने देखील सुलभ होई. केरळमध्ये मान्सूनपूर्व पाऊस व्यापक असेल असेही स्कायमेटने सांगितले आहे.
दरम्यान, 14 एप्रिलला स्कायमेटने मान्सूनचा अंदाज वर्तवला होता. यंदा मान्सून सामान्य राहिल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. या अंदाजानुसार देशभरात मान्सून (जून ते सप्टेंबर) सरासरीच्या 98 टक्के राहण्याची शक्यता आहे. यात पाच टक्क्यांपेक्षा कमी किंवा जास्त एरर मार्जिन आहे. स्कायमेटने यापूर्वी 21 फेब्रुवारी रोजी मान्सूनचा अंदाज जारी केला होता, ज्यामध्ये यावर्षी मान्सून सामान्य असेल असं सांगितलं होतं. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मान्सून महत्त्वाचा आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा तर आहेच, पण कॉर्पोरेट कंपन्यांपासून ते शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांपर्यंतही त्याचा खोलवर परिणाम होतो.
स्कायमेट संस्थेबद्दल
स्कायमेट ही हवामान अंदाज आणि कृषी जोखीम उपाय या क्षेत्रातील एक आघाडीची भारतातील खासगी कंपनी आहे. भारतातील एकमेव खासगी क्षेत्रातील हवामान अंदाज वर्तवणारी स्कायमेट ही संस्था आहे. ती 2003 मध्ये सुरु झाली. तेव्हापासून स्कायमेट सतत हवामानाचा अंदाज वर्तवते. स्कायमेट स्वतःचे अंकीय हवामान अंदाज मॉडेल चालवते. विविध माध्यमांद्वारे हवामानाशी संबंधित सेवांची विस्तृत श्रेणी प्रदान करते.
महत्त्वाच्या बातम्या: