एक्स्प्लोर

आटपाडी तालुक्यातील डाळींब शेतीवर 'पिन होल बोरर' किडीचे संकट; बागा काढून काटण्याची शेतकऱ्यांवर वेळ

आटपाडी तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी आतापर्यंत डाळिंबावरील तेल्या आणि मर या रोगाचा सामना करत डाळींब पिकवत होते. परंतु, आता या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसमोर पिन होल बोरर किडीचे संकट उभे ठाकले आहे.

सांगली : जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील डाळींब शेतीवर 'पिन होल बोरर' किडीचे संकट आले आहे. त्यामुळे डाळींबाची झाडे काढून टाकण्याची शेतकऱ्यांवर वेळ आहे. 

आटपाडी तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी आतापर्यंत डाळिंबावरील तेल्या आणि मर या रोगाचा सामना करत डाळींब पिकवत होते. परंतु, आता या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसमोर पिन होल बोरर किडीचे संकट उभे ठाकले आहे.   पिन होल बोरर या किडीच्या प्रादुर्भावातून डाळिंबाने लखडलेली झाडे पिवळी पडून नंतर वाळून जात आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या बागांमध्ये या किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे अशा बागेतील डाळींबाची काही झाडे वाळून गेली आहेत तर काही झाडे पिवळी पडू लागली आहेत.

मागील दोन-तीन वर्षांमध्ये डाळिंबच्या बागेतून मर आणि अवकाळीचा सामना करत जेमतेम उत्पन्न घेतल्याचे आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावचे धोंडीराम भोसले हे शेतकरी सांगत आहेत. परंतु, आता त्यांची बाग पिवळी पडली असून गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्या दीड-दोन एकरातील 680 झाडावर पिन होल बोरर या किडीचा प्रादुर्भाव झला आहे. त्यामुळे भोसले यांचे मोठे नुकसान झाले आहे. किडीच्या प्रादुर्भावामुळे आता भोसले  यांना शेतातील सर्व झाडे काढून टाकावी लागणार आहेत. 

भोसले यांच्या शेतातील डाळिंबाची झाडे डाळिंबाने लखडली होती. परंतु,आता या किडीमुळे ही सर्व डाळिंबे खराब झाली आहेत. त्यामुळे हा हंगाम तर पूर्ण वाया गेला आहे. परंतु, किडीमुळे डाळिंबाची झाडेच तोडून टाकायची वेळ आली आहे. पिन होल बोरर ही कीड झाडाच्या खोडाला लागते. त्यामुळे झाडाला ठिकठिकाणी छिद्रे पडतात आणि त्यातून भुसा बाहेर पडतो. त्यामुळे हिरवे पाने पिवळी पडू लागतात आणि झाडे वाळायला सुरुवात होते. झाडावर डाळिंब असते मात्र झाडच वाळू लागल्याने डाळिंब देखील वाळून जातात अशी माहिती धोंडीराम भोसले यांनी दिली.  

धोंडीराम भोसले यांच्या सारखीच तालुक्यात अनेक शेतकऱ्यांची अवस्था आहे. आटपाडी तालुक्यात 15 हजार हेक्टरवर डाळिंब लागवड आहे. यातील आतापर्यंत 4 ते 5 हजार हेक्टर बागा या किडीच्या प्रादुर्भावाखाली आहेत. म्हणजे जवळपास आटपाडी तालुक्यातील 50 टक्के बागा किडीच्या प्रादुर्भावाखाली आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत या बागांमध्ये किडीचा प्रादुर्भाव वाढेल आणि या बागा काढून टाकण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget