मी कृषीमंत्री झालो आणि पहिली फाईल...शरद पवार यांनी सांगितला तो किस्सा
शेतीच्या क्षेत्रात अनेक बदल होत आहेत. आपला देश स्वत:ची गरज भागवून जगातील अनेक देशांना अन्नधान्याचा पुरवठा करत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केलं.
Sharad Pawar : आपला देश हा कृषीप्रधान आहे. शेतीच्या क्षेत्रात अनेक बदल होत आहेत. आपला देश स्वत:ची गरज भागवून जगातील अनेक देशांना अन्नधान्याचा पुरवठा करत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केलं. केंद्रात मी ज्यावेळी कृषीची जबाबदारी स्विकारली त्यावेळी पाहिलीच फाईल माझ्याकडे आली की ब्राझीलमधून अन्नधान्य आयात करायचे. हे एकूण मी अस्वस्थ झाल्याचे शरद पवार म्हणाले. तेव्हा मी ठरवलं होतं ही परिस्थिती अशी ठेवायची नाही. हे चित्र बदललं पाहिजे. त्यानंतर पुढच्या पाच ते सहा वर्षात सगळं चित्र बदललं. आपला देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाल्याचे शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांच्या हस्ते आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार इन्स्पायर फेलोशिप प्रदान सोहळा आयोजित केला होता. शिक्षण, साहित्य आणि कृषी क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार यावेळी शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पवार बोलत होते. शेतीच्या क्षेत्रात अनेक शास्त्रज्ञांनी प्रचंड संशोधन केलं. त्या सर्व संशोधकांचे अभिनंदन शरद पवार यांनी केलं.
साहित्याच्या क्षेत्रात नवनवीन लेखक येत आहेत
साहित्याच्या क्षेत्रात नवनवीन लेखक येत आहेत. इतरांना प्रेरीत करत आहेत. हे चित्र पुणे मुंबईपर्यंत नाहीतर महाराष्ट्राच्या खेडो पाड्या पर्यंत आहेत. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण वाचायला मिळते असे शरद पवार म्हणाले. यावेळी शरद पवार यांनी एका कवीने एकवलेल्या कवितेचाही उल्लेख केला. या कवीनं मूर्तिकाराची कविता ऐकवली होती. तो बोलला मी ह्या ठिकाणी हातोड्याने ब्रम्ह विष्णू महेश घडवले. त्यानंतर त्यांना मंदिरात ठेवलं. पण त्या मंदिरात मला प्रवेश दिला नाही. त्यांना मी विचारलं हे जे ब्रह्म विष्णू महेश घडवले त्यांना बनवणारा मी आहे. मग मला कसे नाकारणार. अशा आशयाच्या अनेक कविता ऐकल्या आणि त्यातुन नवीन लेखक पाहिल्याचे शरद पार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: