एक्स्प्लोर

Cashew Nut : सह्याद्रीच्या काजू प्रक्रिया प्रकल्पामुळं शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीबरोबरच रोजगार निर्मिती वाढणार : विलास शिंदे

सह्याद्री फार्म्समध्ये राज्यातील सर्वात मोठा काजू प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पामुळं शेतकऱ्यांच्या उत्पन्नाबरोबर रोजगारही वाढणार असल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी दिली.

Cashew Nut Processing Plant : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मोहाडीत सह्याद्री फार्म्समध्ये (Sahyadri Farmer Producer Company) राज्यातील सर्वात मोठा काजू प्रक्रिया प्रकल्प (Cashew Nut Processing Plant) उभारला आहे. प्रतिदिन तब्बल 100 टन क्षमतेच्या काजूवर प्रक्रिया होणारा हा प्रकल्प आहे. काजू निर्मितीबरोबरच काजू कवचापासून तेल निर्मितीही सुरु करण्यात आली असल्याचे माहिती सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे (Vilas Shinde) यांनी दिली. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीबरोबरच गावातच रोजगाराची संधी निर्माण होणार असल्याचे शिंदे म्हणाले.

आदिवासी पट्टयातील भागाचे अर्थकारण उंचावणार

द्राक्ष आणि फलोत्पादन निर्यातीत आघाडीवर असलेल्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने कोकण आणि आदिवासी पट्ट्यातील महत्वाचे पिक असलेल्या काजूच्या मुल्यसाखळी उभारणीवरही भर देण्यास सुरवात केली आहे. राज्यातील सर्वात मोठा काजू प्रक्रिया प्रकल्प सह्याद्री फार्म्स मध्ये कार्यान्वित करण्यात आला आहे. मोहाडीत 100 टन क्षमतेचा प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. यामुळं राज्यातील तसेच नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पट्टयातील भागाचे अर्थकारण उंचावण्यास मदत होणार असल्याचे शिंदे म्हणाले. 

काजूमध्ये शेती आणि व्यापार वाढीला संधी 

जगात काजू उत्पादनात भारत म्हणून आपण जगात आघाडीवर असलो तरीही देशांतर्गत असलेली काजूची मागणीही आपण पूर्ण करु शकत नाही. इतकी या शेतीत आणि व्यापारात वाढीला संधी आहे. महाराष्ट्रात कोकणाबरोबरच सह्याद्रीच्या पर्वतरांगातील घाटमाथ्यावरील इतरही भागात काजूमुळं आर्थिक क्रांती घडवण्याची संधी आहे. या संधीचे रुपांतर ताकदीच्या मुल्यवर्धित साखळीत करण्याची गरज आहे. त्यासाठी सह्याद्रीने ही सुरुवात केल्याची माहिती शिंदे यांनी दिली.  

शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीबरोबरच गावातच रोजगाराची संधी

काजूची सरासरी उत्पादकता वाढवण्याबरोबरच दुसरीकडे काजू गर आणि बोंडापासून तयार होणाऱ्या उत्पादनांचे मोठे प्रकल्प उभारण्यावर भर देणे गरजेचे आहे. यातून केवळ काजू उत्पादक शेतकऱ्यांचेच उत्पन्न वाढणार नाही तर गावातच रोजगाराची संधी निर्माण झाल्यामुळं रोजगारासाठी शहरात गेलेला तरुणवर्ग पुन्हा गावात स्थिरावणार आहे. इतकी क्षमता यात आहे. त्यासाठी काजू पिकाच्या मुल्यसाखळ्या उभा करण्यावर ‘सह्याद्री फार्म्स‘ भर देणार असल्याचे शिंदे म्हणाले.  

सह्याद्रीच्या काजू प्रक्रिया प्रकल्पाची वैशिष्ट्ये

प्रति दिनी 100 टन कच्चे काजू हाताळणीची क्षमता 
देशातील टॉप 10 मधील आणि राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प 
प्रक्रियेची सर्व यंत्रणा एकाच ठिकाणी 
काजू कवचापासून तेल काढणीचा 20 टन क्षमतेचा प्लॅन्ट 
उत्पादन गुणवत्तेच्या बीआरसी उच्च मानकांच्या समकक्ष व्यवस्थापन 
परिसरातील 300 हून अधिक महिलांना कायमस्वरुपी रोजगार

महत्त्वाच्या बातम्या:

Nashik News : 20 कोटींची गुंतवणूक, वर्षाला 30 हजार टन क्षमता, नाशिकच्या सह्याद्री फार्म्सने उभारला काजू प्रक्रिया प्रकल्प    

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीसRohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Devendra Fadnavis on CM Post: आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Embed widget